स्टार ८१२ किडनीच्या रुग्णांनी कोरोनाकाळात काळजी घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:23+5:302021-06-17T04:16:23+5:30
शरीरातील अशुद्ध घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम किडनीच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे किडनीचे काम जितके व्यवस्थित सुरू असते ...
शरीरातील अशुद्ध घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम किडनीच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे किडनीचे काम जितके व्यवस्थित सुरू असते तितकी व्यक्ती निरोगी राहण्यास मदत असते. ज्यांना आधीच किडनीचा त्रास आहे त्यांना जर कोरोना झाला असेल तर तो त्रास वाढू शकतो. कारण कोरोनाचे उपचार सुरू असताना जी औषधे दिली जातात त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण पुन्हा वाढते. ज्यांना आधी किडनीचा त्रास नव्हता अशांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना नव्याने हा आजार होऊ शकतो.
बॉक्स
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास...
किडनीचा आजार आधीपासून असणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाल्यास त्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. किडनी व्यवस्थित काम करत आहे की नाही याची चाचणी वेळोवेळी करून घ्यावी तसेच या काळात औषधे घेतानाही आपल्या ज्ञानावर न घेता डॉक्टरांशी बोलूनच औषधांचे सेवन करावे.
चौकट
हे करा...
- दिवसातून अनेक वेळा पाणी पिण्याची गरज. प्रत्येकाने किमान अडीच ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे. त्यामुळे शरीर शुद्धिकरण प्रक्रिया चांगली राहते. ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता भासू नये यासाठी लिंबूवर्गीय फळांचे सेवन करावे. नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घ्यावी. जागरण टाळावे.
चौकट
हे करू नका...
अनेकांना लघवी तटवण्याची सवय असते; परंतु ती अतिशय धोकादायक सवय आहे. त्यामुळे लघवी लागल्यानंतर जाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. किडनी आणि मधुमेह हे आजार एकमेकांना पूरक असल्याने हलगर्जीपणा टाळावा. किडनीच्या रुग्णांनी मांसाहार असे प्रोटिनयुक्त अन्न टाळावे.
चौकट
नेहमीच्या डॉक्टरांशी बोलूनच स्टेरॉईड घ्या
- कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर किंवा कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्यानंतर अनेकदा माहिती असलेली औषधे घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, तसे करणे धोकादायक आहे. कोरोनाच्या उपचारात स्टेरॉईड दिले जाते; पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य मात्रेनेच घेण्याची गरज आहे. स्टेराॅईडमुळे रक्तातील साखर वाढते व त्याचा पुन्हा परिणाम किडनीवर होऊ शकतो.
कोट
स्टेरॉईड दिल्याचा थेट किडनीवर परिणाम होत नाही; परंतू त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढते आणि त्याचा प्रादुर्भाव किडनीवर होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईड घेेणे धोकादायक ठरू शकते. याचा डोस कमी करतानाही तो टप्प्या-टप्प्याने कमी करावा लागतो. अन्यथा त्याचेही विपरित परिणाम होतात.
डॉ. युवराज सावंत, नेफ्रॉलॉजिस्ट, ॲस्टर आधार
कोरोनाचे एकूण रुग्ण - १,३५,५८४
बरे झालेले रुग्ण - १,१९,५९२
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ११,७५९
एकूण मृत्यू - ४२३३