स्टार ८१७ आला पावसाळा...सापांपासून सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:15+5:302021-06-16T04:31:15+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पावसाळा सुरू झाल्याने सापांच्या लपण्याच्या ठिकाणात पाणी येते. परिणाम विषारी, बिनविषारी साप ...

Star 817 It's raining ... Beware of snakes | स्टार ८१७ आला पावसाळा...सापांपासून सावधान

स्टार ८१७ आला पावसाळा...सापांपासून सावधान

Next

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पावसाळा सुरू झाल्याने सापांच्या लपण्याच्या ठिकाणात पाणी येते. परिणाम विषारी, बिनविषारी साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. या कालावधीत शेतवड व मानवी वस्तीतही सापांचा वावर अधिक असल्याने सर्पदंशाच्या घटना अधिक घडतात. जिल्ह्यात नाग, घोणस, मण्यार व फुरसे या चार प्रजाती विषारी असल्याने या सापांपासून सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

नाग, घोणस हे बारमाही बाहेर पडत असले तरी पावसाळ्यात त्यांचा प्रजननाचा कालावधी असतो. बिळात पाणी गेल्याने सुरक्षित आसरा शोधण्यासाठी पिलांसह हे साप बाहेर पडतात. पूर्वी शेतवड, जंगलात सापांचे प्रमाण अधिक असायचे, आता मानवी वस्तीत उंदरांचे प्रमाण वाढल्याने त्यांचा ओढा वाढला आहे.

साप आढळला तर घाबरू नका

साप आढळला तर घाबरू नये, त्याला मारण्यासाठी गडबड न करता त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून रहावे. सर्पमित्रास बोलावणे किंवा ‘१९२६’ या टोल फ्री क्रमांकावर वन विभागाला कळवावे.

डूक धरणे...अंधश्रद्धा

सापाला धक्का अथवा जखमी केले तर तो डूक धरतो, अशी अंधश्रद्धा आहे. साप मेल्यानंतर विशेषत: धामीण मरताना अंगातून द्रव सोडते. त्याच्या वासाने नर तिथे येतो, त्यामुळे सापाला मारल्यानंतर सूडासाठी तो आल्याचा आपल्याकडे समज आहे.

सर्पदंशानंतर तातडीने दवाखान्यात हलवावे

संर्पदंश झाल्यानंतर आपण घरगुती उपाय करत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले. दंश झाल्यानंतर घाबरल्याने रक्ताभिसरण वाढते आणि विष जलद रक्तात मिसळते. तातडीने दवाखान्यात नेऊन उपचार सुरू करावेत. सरकारी दवाखान्यात ‘अन्टीस्नेक’ (एएसव्ही) इंजेक्शन दिल्यानंतर विष उतरण्यास मदत होते.

विषारी साप-

नाग :

देशातील ‘बीग फोर’ सापांमध्ये नागाचा समावेश आहे.

दंशानंतर माणसाच्या मज्जातंतू व चेतासंस्थेवर परिणाम करते.

चिडल्यानंतर फणा काढतो, त्याच्या मागील बाजूस दहाचा आकडा दिसतो.

मादी एकाच वेळी ८ ते १० अंडी घालते.

घोणस :

देशातील सर्वांत अधिक घातक साप

दंशानंतर विष अतिशय जलद गतीने रक्तात पसरते आणि रक्त गोठवते.

चिडल्यानंतर अंग एकत्र करतो व कुकरच्या शिट्टीसारखा फुत्कारण्याचा आवाज काढतो.

अंडी न घालता एकाच वेळी ३० ते ४० पिलांना जन्म देते.

मण्यार :

नागापेक्षाही सातपट जहाल मानला जातो.

चिडलेला समजत नसल्याने ‘सायलन्ट किलर’ म्हणून ओळख.

रात्रीच्या वेळी संचार करतो, दंश केल्यानंतर पाच-सहा तासांनी लक्षणे दिसतात.

एकाच वेळी पाच ते सात अंडी घालून पिलांना जन्म देतो.

फुरसे :

डोंगर-कपारीत आढळतो.

चिडल्यानंतर स्वत:चा अंग घासत असल्याने करवतासारखा करकर आवाज येतो.

दंश केल्यानंतर विष रक्तात वेगाने पसरते.

अंडी न घालत पिलांना जन्म देतो.

बिनविषारी साप-

धामीण, विरोळा, गवत्या, तस्कर, कवड्या, नानटी, खापरखवल्या, घडुरक्या घोणस, ढोल नागीण

कोट-

साप हा निसर्गाचा अनमोल घटक असून त्याला मानवाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. साप दिसताच न घाबरता सर्पमित्रांच्या मदतीने त्याला जंगलात सोडून द्यावे, त्याला मारू नये.

-देवेंद्र भोसले, अध्यक्ष, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲन्ड रिसर्च सोसायटी, कोल्हापूर

Web Title: Star 817 It's raining ... Beware of snakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.