(स्टार ८२२) कोरोना काळात हजारांवर आत्महत्या; भावनिक, आर्थिक आधाराची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:18 AM2021-06-21T04:18:10+5:302021-06-21T04:18:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संकटाने उद्योगधंदे-व्यवसाय बंद पडले, अनेकांच्या नोक-या गेल्या, बेरोजगारी वाढली, कुटूंब कसे चालवायचे हा ...

(Star 822) Thousands commit suicide during the Corona period; Need emotional, financial support! | (स्टार ८२२) कोरोना काळात हजारांवर आत्महत्या; भावनिक, आर्थिक आधाराची गरज!

(स्टार ८२२) कोरोना काळात हजारांवर आत्महत्या; भावनिक, आर्थिक आधाराची गरज!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना संकटाने उद्योगधंदे-व्यवसाय बंद पडले, अनेकांच्या नोक-या गेल्या, बेरोजगारी वाढली, कुटूंब कसे चालवायचे हा प्रश्न बहुतांशी जणांसमोर उभारला, जिव्हाळ्याची माणसे कोरोनाने मृत्यू पडली, नैराश्यमय वातावरणात अनेकांना जगणे असह्य झाले, कमकुवत मनाच्या लोकांत नैराश्येची भावना वाढली व आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले. अशांना वेळीच सावरण्यासाठी त्यांना भावनिक व आर्थिक आधाराची गरज असते. गेल्या दीड वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १००६ जणांनी आत्महत्या केल्याची पोलिसांत नोंद आहे.

कोरोनामुळे जीवनातील अर्थचक्रच बंद पडले, त्यामुळे २०२० मध्ये अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. माणसे कर्जाच्या खाईत लोटली अशातच व्यसनाधीनता वाढली. परिणामी नैराश्य येऊन असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यातून आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. त्या कालावधीत ६१९ जणांनी आत्महत्या केल्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरतानाच दुस-या लाटेनेही पुन्हा डोके वर काढले. दुस-या लाटेत, हे संकट फक्त आपल्या एकट्यावरच नाही तर सारेच अडचणीत असल्याची भावना वाढल्याचे दिसते. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ३०७ जणांनी जीवनयात्रा संपवली.

जिल्ह्यातील आत्महत्या-

- २०१९ मध्ये आत्महत्या : ५७०

- २०२० मध्ये आत्महत्या : ६१९

- २०२१ जाने. ते मे आत्महत्या : ३०७

आत्महत्या कोणत्या वयात... (जाने. ते मे २०२१)

- २५ वयापेक्षा कमी : ३५

- २६ ते ४० वयोगट : १३२

- ४१ ते ६० वयोगट : ११८

- ६० पेक्षा जास्त : २२

हे दिवस जातील...

प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणीचा काळ येत असतो, नंतर आनंदाचे क्षणही येतात. हा विचार प्रत्येकाने करायला हवा. कोरोनाचे संकट हे फक्त एकट्यावरच नसून सर्वांवर आहे, त्याचा सर्वांनाच त्रास सुरू आहे. कोरोनामुळे सामाजिक बंधणे आली. एकलकोंडेपणा वाढला, नैराश्य आले असले तरीही अपराधीपणाची व नकारात्मक भावना सोडून प्रत्येकाने एकमेकांशी संभाषण सुरू ठेवावे. हेही दिवस लवकरच जातील, अशा अपेक्षा बाळगून परिस्थितीचा सामना करावा.

कुटूंबाने काळजी घेण्याची गरज...

संकटामुळे माणसावर आर्थिक, मानसिक दडपण असल्यास कुटूंबातील सदस्याने एकाप्याने राहिले पाहीजे. नैराश्य आले, त्याला एकटे नाही, कुटूंब व मित्रपरिवार सोबत आहे, याची जाणीव करून द्यावी. भावना व्यक्त झाल्या पाहिजे, माणसातील नैराश्य, भयगंड कमी करून विश्वासाची भावना निर्माण झाली पाहिजे.

कोट...

कोरोनामुळे नैराश्य, काळजी, चिंता याचे आजार वाढले. अशांना मानसिक आधाराची गरज असते, प्रसंगी अशा व्यक्तींना समुपदेशन अथवा मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार करून घेणे योग्य राहील. - डॉ. राकेश बेळगुद्री, मानसोपचारतज्ज्ञ, गडहिंग्लज.

कोट...

कोरोनामुळे मानसिक आजाराच्या प्रमाणात २० टक्के वाढ झाली. नैराश्य व भयगंड टाळण्यासाठी अपराधीपणाची भावना अगर नकारात्मकता काढली पाहिजे, वेळीच समुपदेशन केल्यास, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास आत्महत्या रोखता येतील - डॉ. निखिल चौगुले, मानसोपचारतज्ज्ञ, कोल्हापूर.

Web Title: (Star 822) Thousands commit suicide during the Corona period; Need emotional, financial support!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.