(स्टार ८६८) दारु पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाईत अडसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:28+5:302021-07-05T04:15:28+5:30

कोल्हापूर : दारु पिऊन वाहन चालवल्याने राज्यभर अपघाताच्या घटना वाढतच आहेत. पण अशा दारुड्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात पोलिसांना कोरोना ...

(Star 868) Tarrat driving under the influence of alcohol; Corona hinders action! | (स्टार ८६८) दारु पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाईत अडसर!

(स्टार ८६८) दारु पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाईत अडसर!

Next

कोल्हापूर : दारु पिऊन वाहन चालवल्याने राज्यभर अपघाताच्या घटना वाढतच आहेत. पण अशा दारुड्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात पोलिसांना कोरोना संसर्गामुळे मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दारु पिऊन वाहनचालक तर्राट, पण कारवाई थंडच अशी स्थिती बनली आहे. अशा परिस्थितीत दारुड्या वाहनचालकांची रस्त्यावरच तपासणी करणारे ब्रेथ ॲनालायझर मशीन पोलिसांना नाईलाजास्तव गुंडाळून ठेवावे लागले.

दारु पिऊन वाहन चालवल्याने जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षात अपघाताच्या घटना वाढतच आहेत. त्या अनुषंगाने दारुड्या वाहनचालकांवर कारवाईचाही धडाका अधूनमधून पोलिसांमार्फत केला जातो. त्यामुळे कोरोना नसताना २०१९ या वर्षभरात कोल्हापूर शहरात वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला. या वर्षभरात तब्बल ४६८ दारुड्यांवर कलम १८५प्रमाणे गुन्हे नोंदविण्याची कारवाई करत त्यांना न्यायालयात पाठवले. न्यायालयात अशा वाहनधारकाला ५०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे. हाच कारवाईचा धडाका २०२०मध्येही सुरु ठेवला. मार्चपर्यंत तब्बल १००हून अधिक मद्यपींवर कारवाई केली. पण मार्च अखेरीस कोरोनाचा कोल्हापूर जिल्ह्यात शिरकावा झाला अन् मे महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाल्याने दारुड्या वाहनचालकांवर कारवाई करताना मर्यादा आल्या. कोरोनाच्या नियमांमुळे दारुड्यांची तपासणी करणारे ब्रेथ ॲनालायझर मशीन गुंडाळून ठेवण्याची वेळ पोलिसांवर आली. त्यामुळे संथगतीने कारवाई होत पुढे पूर्णपणे थंडावली.

मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई :

वर्षे : कारवाईची संख्या

२०१९ : ४६८

२०२० : २६२

२०२१ :

- जानेवारी : ११

- फेब्रुवारी : ०६

- मार्च : १६

- एप्रिल : ०२

- मे : ००

- जून : ००

ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद

रस्त्यावरील दारुड्या वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी ब्रेथ ॲनालायझर हे नवीन मशीन पोलीस दलात दाखल झाले होते. वाहनचालकाची तपासणी करताना या मशीनच्या पुंगळीवर दारुड्या वाहनचालकाने फुंकर मारावी लागते. त्यामुळे एखादा वाहनचालक कोरोनाबाधित असेल तर त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार हे मशीन बंद ठेवावे लागले. त्यामुळे ब्रेथ ॲनालायझर मशीनद्वारे मे २०२०पासून दारुड्या वाहनचालकांची तपासणी बंद केली.

कोट...

कोरोना संसर्गामुळे शासनाने दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर राखणे बंधनकारक केले. त्यातच लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहतूक कमी झाली. कोरोना संसर्ग होण्याच्या अनुषंगाने ब्रेथ ॲनालायझर मशीन बंद ठेवले. त्यातूनही मर्यादा असल्या तरीही दारुड्या वाहनचालकांवर कारवाई सुरुच ठेवली. - स्मिता गिरी, पोलीस निरीक्षक, कोल्हापूर शहर वाहतूक कक्ष.

Web Title: (Star 868) Tarrat driving under the influence of alcohol; Corona hinders action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.