(स्टार ८७०) कोरोनाच्या निर्बंधांमुळे लर्निंगसह पर्मनंटही अजून ‘ऑफ’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:16 AM2021-07-03T04:16:00+5:302021-07-03T04:16:00+5:30

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत येणारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ८० टक्के कामकाज थंडावले आहे. राज्य ...

(Star 870) Due to Corona's restrictions, permanent as well as learning is still 'off' | (स्टार ८७०) कोरोनाच्या निर्बंधांमुळे लर्निंगसह पर्मनंटही अजून ‘ऑफ’च

(स्टार ८७०) कोरोनाच्या निर्बंधांमुळे लर्निंगसह पर्मनंटही अजून ‘ऑफ’च

googlenewsNext

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत येणारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ८० टक्के कामकाज थंडावले आहे. राज्य शासनानेही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दररोजचा मृत्युदर यामुळे जिल्ह्याचा ४ क्रमांकाच्या वर्गवारीत समावेश केला आहे. त्यामुळे गर्दी होणारी ठिकाणी बंदच ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून लर्निंगसह पर्मनंट (पक्के) लायसेन्स देण्याचे बंद करण्यात आले आहे. लर्निंगसाठीची परीक्षाही बंद करण्यात आली आहे. यासोबत पक्के लायसेन्ससाठी वाहन चालविण्याची चाचणीही बंद केली आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे वाहन चालविण्याचे परवाने गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. केंद्र शासनानेही घरबसल्या आता युवकांना लर्निंग लायसेन्स काढण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, त्याचे ॲप अथवा संकेतस्थळ अजूनही बंद अवस्थेत आहे. त्यामुळे इच्छुक हे ॲप कधी सुरू होणार याची विचारणा फोनद्वारे करीत आहेत.

वाहन परवाना विभाग अजूनही बंद

सध्या लायसेन्स विभाग पूर्ण बंद आहे. नियमित या विभागातून रोज २०० लर्निंग (कच्चे), तर २८० पक्के (पर्मनंट) लायसेन्सचा कोटा होता. आता मात्र, लर्निंग लायसेन्स घरबसल्या चाचणी परीक्षा देऊन काढता येणार आहे. मात्र, हे ॲप तत्सम संकेतस्थळ अद्यापही सुरू नाही. त्यामुळे इच्छुकांची गोची झाली आहे. पोलीस लायसेन्स नसल्यामुळे वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाई करीत आहेत.

ऑनलाईनसाठी अडचणीच अडचणी

नव्या नियमानुसार व ॲपद्वारे लर्निंगसाठी नोंदणी होऊ शकत नाही. त्यामुळे यापूर्वी ज्यांनी लर्निंग लायसेन्स काढले त्यांनाही पर्मनंट लायसेन्स काढण्यासाठी ॲपाईंटमेंट तारीख कार्यालयाकडून दिलेली नाही. त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

किती लायसेन्स दिली?

साल लर्निंग पर्मनंट

२०१८-१९ ८४,२१६ ३६,४७०

२०१९-२० १,०१, ६५६ ३०, ६८२

२०२०-२१ २,०१,०२४ ४३, ०९८

कोट

कोरोनाच्या निर्बंधांमुळे आणि वाढता संसर्ग रोखण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून इच्छुकांना अपाॅईंटमेंट दिली जात नाही. पर्मनंट लायसेन्सकरीता गर्दी होण्याचा धोका अधिक आहे. त्यातून कोरोना संसर्गाची अधिक लागण होऊ शकते. शासनाने निर्बंध कमी केल्यानंतर ती लवकरच सुरू केली जाईल.

- डाॅ. स्टीव्हन अल्वारीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

-

Web Title: (Star 870) Due to Corona's restrictions, permanent as well as learning is still 'off'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.