स्टार ८७१ : डेल्टा प्लसला कसे रोखणार, दोन्ही डोस घेणारे केवळ २२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:26+5:302021-07-03T04:17:26+5:30

कोल्हापूर : डेल्टा प्लस विषाणूचा प्रसार वेगाने वाढत असताना, त्याला रोखण्याचे सामर्थ्य असलेल्या लसीकरणाचा वेग वाढत नसल्याने याला रोखायचे ...

Star 871: How to stop Delta Plus, only 22% taking both doses | स्टार ८७१ : डेल्टा प्लसला कसे रोखणार, दोन्ही डोस घेणारे केवळ २२ टक्के

स्टार ८७१ : डेल्टा प्लसला कसे रोखणार, दोन्ही डोस घेणारे केवळ २२ टक्के

Next

कोल्हापूर : डेल्टा प्लस विषाणूचा प्रसार वेगाने वाढत असताना, त्याला रोखण्याचे सामर्थ्य असलेल्या लसीकरणाचा वेग वाढत नसल्याने याला रोखायचे कसे? असा नवा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यात पहिला डोस ७७ टक्के नागरिकांनी घेतला आहे, तर केवळ २२ टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत चोरपावलांनी आलेला डेल्टा प्लस विषाणूने आता वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. हा विषाणू घातक असल्याचा संशोधकांचा निष्कर्ष पाहता, यावर लसीकरण हाच उत्तम उपाय आहे; पण नेमके घोडे येथेच अडत आहे. लसीकरणाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाचा वेग वाढत नसल्याने या डेल्टाचा सामना करायचा तरी कसा? या विवंचनेत आरोग्य विभाग आहे. नागरिकही लस मिळत नसल्याने हतबल आहेत. जिल्ह्यात ३४ लाख ४३ हजार ८१७ नागरिकांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १२ लाख ८२ हजार ९२२ जणांनी आतापर्यंत लस घेतली आहे. यात फ्रंट लाईन वर्कर आघाडीवर आहेत.

तालुका पहिला दुसरा

आजरा ३६९६८ १०१९५

भुदरगड ५२१३८ ११९६५

चंदगड ५७११३ १५७२४

गडहिंग्लज ७०२७६ २०८०६

गगनबावडा ११८०० ३४७१

हातकणंगले १८४४५४ ५५०१७

कागल ७१९५० १६०४९

करवीर २३५२६६ ८२७६३

पन्हाळा ६१९९१ १६२६६

राधानगरी ५८५२१ १६८१४

शाहूवाडी ५५७०१ १५४७२

शिरोळ ९७२०४ २४९९८

लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट : ३४ लाख ४३ हजार ८१७

आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण १२ लाख ८२ हजार ९२२

पहिला डाेस : ९ लाख ९३ हजार ३८२

दुसरा डाेस : २ लाख ८९ हजार ५४०

गट उद्दिष्ट पहिला डोस टक्केवारी दुसरा डोस टक्केवारी

हेल्थ केअर वर्कर ३८२२६ ४३७६४ ११४ २३३६३ ६१

फ्रंटलाईन वर्कर २९८२१ ७९६८० २६७ २७५८० ९२

१८ ते ४४ १८५२३६८ १७९९९ १ ६१६२ ०

४५ ते ६० १५२३३७२ ४१५८०६ ५६ ८१२३४ १५

६० वर्षांवरील ४३६१३३ १५१२०१

एकूण ३४४३८१७ ९९३३८२ ७७ २८९५४० २२

१८ ते ४४ वयोगटात केवळ १ टक्के

डेल्टा प्लस विषाणूचा सर्वाधिक मारा हा तरुण वर्गावर होत असल्याचा संशोधनाचा निष्कर्ष असला तरी लसीकरणात मात्र १८ ते ४४ वयोगट खूप मागे आहे. आतापर्यंत या वयोगटातील केवळ १ टक्का लसीकरण झाले आहे. १८ लाख ५२ हजार ३६८ इतकी या वयोगटातील तरुणांची संख्या आहे; पण यातील केवळ १७ हजार ९९९ म्हणजेच १ टक्का लसीकरण झाले आहे. दुसरा डोस तर एकालाही दिलेला नाही.

Web Title: Star 871: How to stop Delta Plus, only 22% taking both doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.