(स्टार ८७९) भाजी मंडईत जाताय मोबाइल सांभाळा; दररोज दोन-तीन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:17 AM2021-07-04T04:17:03+5:302021-07-04T04:17:03+5:30

कोल्हापूर : शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, गंगावेश, रेल्वे स्थानक आदी भाजी मंडईत जाता, तर आपला मोबाइल सांभाळा असे सांगण्याची वेळ ...

(Star 879) Take your mobile to the vegetable market; Two to three complaints per day | (स्टार ८७९) भाजी मंडईत जाताय मोबाइल सांभाळा; दररोज दोन-तीन तक्रारी

(स्टार ८७९) भाजी मंडईत जाताय मोबाइल सांभाळा; दररोज दोन-तीन तक्रारी

Next

कोल्हापूर : शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, गंगावेश, रेल्वे स्थानक आदी भाजी मंडईत जाता, तर आपला मोबाइल सांभाळा असे सांगण्याची वेळ आली. शहरातील प्रामुख्याने भाजी मंडईत ग्राहकांचे मोबाइल चोरी, हरवण्याचे प्रमाण मोठे आहे. रोज पोलीस स्टेशनला मोबाइल चोरीच्या दोन-तीन तक्रारी दाखल होतात. गर्दीत खिशातील अलगदपणे मोबाइल उचलणारे चोरटे सक्रिय आहेत. गेल्या अडीच वर्षात शहरातून सुमारे १५११ मोबाइल चोरी अगर गहाळ झाले, त्यापैकी ३५७ मोबाइलचा शोध लागला.

शहरातून चोरी अथवा गहाळ मोबाइलच्या तक्रारी पोलिसात नोंद होतात. त्याप्रमाणात सापडण्याच्या घटना नगण्यच आहेत. चोरीला गेलेला मोबाइल पुन्हा मिळत नाही अशीच नागरिकांची मानसिकता आहे. त्यामुळे गहाळ मोबाइलच्या तक्रारीसाठी नागरिक पुढे येत नाहीत.

सर्वाधिक घटना

अ) भाजी मंडई : शहरातील विशेषत कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरी, गंगावेश या भाजी मंडईत ग्राहक भाजी घेण्यात गर्क असतात, त्याचवेळी त्याच्या शर्टच्या खिशातील मोबाइल अलगदपणे उचलून लंपास केला जातो.

ब) महाद्वार रोड : शहरातील खरेदीसाठी नेहमी गर्दी असणाऱ्या महाद्वार रोडवर चोरट्यांची मोठी संख्या आहे, तेथेही मोबाइल चोरीच्या मोठ्या घटना घडतात.

क) मध्यवर्ती बसस्थानक : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा उठवत धक्काबुक्कीत प्रवाशांच्या शर्टच्या अगर पॅटच्या खिशातील मोबाइल चोरला जातो.

ड) अंबाबाई मंदिर : मंदिरात स्थानिक तसेच परजिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने असतात, त्याचेही मोबाइल चोरीच्या वारंवार घटना घडतात.

७० टक्के मोबाइलचा शोध लागेना...

गेल्या अडीच वर्षात तब्बल दीड हजारावर मोबाइल चोरी अगर गहाळ होण्याचे प्रकार घडले. त्यापैकी सुमारे साडेतीनशे मोबाइलचा शोध लागला. इतर मोबाइलचा शोध लावण्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरूच आहे.

मोबाइल चोरी झाल्यास प्रथम हे करा...

१) प्रथम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा.

२) मोबाइलचे सीमकार्ड ब्लॉक करण्यासाठी कंपनीच्या नंबरवर कळवा.

३) चोरीला गेलेल्या मोबाइलचे पासवर्ड ऑनलाइनद्वारे बदला.

४) पंधरा अंकी ‘आयएमएआय’ नंबर माहिती असल्यास तो प्रथम पोलीस स्टेशनला अगर संबंधित कंपनीला कळवा.

५) एफआयआर नोंदवल्यानंतर तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाइलवरून काही चूक झाल्यास त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरले जात नाही.

मोबाइल चोरी अगर हरवल्याच्या तक्रारी...

- वर्षे : तक्रारी : परत मिळाले

- २०१९ : ६७८ : १८०

- २०२० : ६१० : १३४

- २०२१ :

-जानेवारी : ५६ : १६

- फेब्रुवारी : ६१ : ११

- मार्च : ५२ : ०५

- एप्रिल : २६ : ०९

- मे : ०७ : ००

- जून : २१ : ०२

कोट...

चोरीला गेलेला मोबाइल शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात, त्यासाठी बराच वेळ खर्चिक होतो. मोबाइल चोर पकडताना तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणावर येतात, त्यावरही पोलीस मात करून चोरट्यांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न करतात. - मंगेेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर शहर

Web Title: (Star 879) Take your mobile to the vegetable market; Two to three complaints per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.