स्टार ८९३ न्यूमोकॉकल लस रोखणार बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:17+5:302021-07-09T04:16:17+5:30
कोल्हापूर : न्यूमोनियामुळे दरवर्षी भारतामध्ये ५० हजारांहून अधिक बालमृत्यू होतात. हे बालमृत्यू रोखण्यासाठी २०१७ ...
कोल्हापूर : न्यूमोनियामुळे दरवर्षी भारतामध्ये ५० हजारांहून अधिक बालमृत्यू होतात. हे बालमृत्यू रोखण्यासाठी २०१७ पासून देशभरामध्ये ‘न्यूमोकोकल’ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने राबवली जाणारी ही मोहीम १२ जुलैपासून राज्यात राबवली जाणार आहे. यामुळे बालमृत्यू रोखण्यास मदत होणार आहे.
या लसीचे महत्त्व ओळखून राष्ट्रीय नियमित लसीकरण मोहिमेमध्ये आता या लसीकरणाचा समावेश करण्यात आला आहे.
१) जिल्ह्यातील बालकांचा जन्म-मृत्यू दर टक्क्यांमध्ये
वर्ष जन्म दर अर्भक मृत्यू दर बालमृत्यू दर
२०१८ १०.७ १६.५ ६.३
२०१९ १०.८ १५.२ ६.१
२०२० १०.८ १४.१ ७.२
चौकट
२) काय आहे न्यूमोकाॅकल न्यूमोनिया?
न्यूमोनिया हा वेगवेगळ्या जिवाणूपासून होतो. न्यूमोकॉकल नावाचा जो जिवाणू आहे, त्याची लागण होऊन बालकांना न्यूमोनिया होतो. त्याला न्यूमोकॉकल न्यूमोनिया म्हणतात.
चौकट
३) या आजाराची लक्षणे काय?
ताप, सर्दी, खोकला, छाती भरणे ही या आजारांची प्रमुख लक्षणे आहेत. श्वसनाचा त्रासही होतो. कानातून पाणी येणे, पू येणे, आकडी येणे, मेंदूला सूज येणे अशा सारखीही लक्षणे या आजारामध्ये आढळतात.
चौकट
४) जिल्ह्यात तीन टप्प्यांत होणार लसीकरण
जिल्ह्यात तीन टप्प्यांत हे लसीकरण होणार आहे. दीड महिन्याची जी बालके आहेत, त्यांना पहिला डोस दिला जाईल. साडेतीन महिन्यांनंतर त्यांना दुसरा डोस दिला जाईल आणि नऊ महिने पूर्ण झाले की, शेवटचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. ही लस तोंडावाटे नसून ती टोचली जाणार आहे.
कोट
५) जिल्हा लसीकरण अधिकारी
जिल्ह्यामध्ये लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून, त्यांनीही तालुका पातळीवर आशा व अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतगर्त सुरू असलेल्या या लसीकरणाची माहिती घेऊन नागरिकांनी आपल्या दीड वर्षावरील बालकांचे लसीकरण करून घ्यावे.
डॉ. फारूक देसाई, माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर