(स्टार ८९५) अहो आश्चर्य, बायकोचा मोबाईल नंबरच नाही आठवत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:17+5:302021-07-11T04:17:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सध्या आधुनिकतेच्या काळात ‘शॉर्टकट’चा वापर वाढला आहे. ‘भावा, मेमरीला लई त्रास द्यायचा नाही, काम ...

(Star 895) Surprise, I don't even remember my wife's mobile number! | (स्टार ८९५) अहो आश्चर्य, बायकोचा मोबाईल नंबरच नाही आठवत !

(स्टार ८९५) अहो आश्चर्य, बायकोचा मोबाईल नंबरच नाही आठवत !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सध्या आधुनिकतेच्या काळात ‘शॉर्टकट’चा वापर वाढला आहे. ‘भावा, मेमरीला लई त्रास द्यायचा नाही, काम कसं झटपट झालं पाहिजे’ असे म्हणणारे हे तरुणाईचे युग आहे. याचा परिणाम माणसाच्या स्मरणशक्तीवर होत आहे. यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात ‘रिॲलिटी चेक’ केला. काही वाहनचालक व पादचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी १०पैकी आठजणांना चक्क आपल्या बायकोचा मोबाईल नंबर माहीत नसल्याचे आढळले, तर बायकांनाही पतीराजांचा नंबर पाठ नसल्याचे दिसले.

धावपळीच्या युगात मोबाईल फोन प्रत्येकाचा अविभाज्य भाग बनला आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मतानुसार, सध्या मोबाईलमध्ये सर्व नंबर नावावर फिडींग असल्याने पाठांतराची गरजच भासत नाही. मेंदूला चालना मिळत नाही. सर्वच परावलंबी झाले. त्यामुळे रिकॉल मेमरीचा प्रत्येकाने वापर करणे आवश्यक आहे, अन्यथा मोबाईल हरवला तर अडचण होऊ शकते.

‘लोकमत’ @ दसरा चौक

अ) बायकोचा मोबाईल नंबर पाठ नाही, कारण तिचा मोबाईल नंबर वारंवार बदलते. त्यामुळे तो माझ्या मोबाईलमध्ये नावाने फिडच असतो.

ब) स्मार्टफोनमुळे बायकोचा मोबाईल नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही वाटत, त्यामुळे मी कधी प्रयत्नही केलेला नाही.

क) माझा फोन हरवला, त्यावेळी मला फोन करण्यासाठी बायकोचा नंबर आठवेना.

ड) बायकोला नवीन नंबर घेऊन दिला, त्यामुळे तो लक्षात नाही.

बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना

‘माझ्या पतीचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये त्यांच्या नावाने सेव्ह आहे, त्याच नावावरुन मी त्यांना आवश्यक वाटल्यास फोन करते. त्यामुळे पाठ करायचा प्रश्नच येत नाही.’ - एक गृहिणी.

‘पतीकडे मोबाईलचे दोन नंबर आहेत, पण त्यापैकी एकच मला आठवतो, दुसरा आठवत नाही. दोन्हीही नंबर त्यांच्या नावानेच सेव्ह असल्याने खरेतर नंबर आठवायची गरजच कधी भासली नाही.’ - एक गृहिणी.

पोरांना मात्र पाठ आई-बाबांचा नंबर !

‘शाळेत तसेच शाळेच्या आयडेंटी कार्डवर पप्पा व मम्मीचा मोबाईल नंबर दिलेला असतो, त्यामुळे गरज पडेल, त्यावेळी मी शाळेतील लॅंडलाईन नंबरवरुन त्यांना फोन करतो. त्यामुळे तो आपोआपच पाठ झाला आहे.’ - रुपेश

‘कोठेही अडचण येऊ नये म्हणून माझ्या आई-बाबांनी आपले नंबर माझ्याकडून पाठ करुन घेतले आहेत. ते नंबर मी कोणाच्याही मोबाईल अगर लॅंडलाईनवरुन लावतो, त्यामुळे ते पाठ झाले आहेत.’ - सोज्वल

तरुणांपासून वृध्दांपर्यंत सारे सारखेच

सध्या तरुण व वृध्द या साऱ्यांनाच एका ‘क्लीक’वर मोबाईल नंबर नावाने शोधण्याची सवय जडली आहे. सध्या सर्वचजण मोबाईल नंबरबाबत परावलंबी बनले आहेत. एखाद्याचा नंबर मागितला तर तो मोबाईलमध्ये शोधून देण्याची वेळ आली आहे. अनेकवेळा पाठ असणारे नंबरही आठवत नाहीत, अशी अवस्था होते.

कोट..

‘स्मार्टफोनमध्ये नंबर नावावर फिडींग असल्याने पाठ नसतोच. एका ‘क्लीक’वर नाव स्क्रिनवर दिसते. प्रत्येकाला सवयच जडली. त्यामुळे मेंदूला चालना मिळत नाही. ‘पॅसिव्हलीपेक्षा ॲक्टिव्हली ’ लक्षात ठेवले पाहिजे. किमान जवळच्यांचे मोबाईल नंबर पाठ असावेत.’ - डॉ. राकेश बेळगुद्री, मानसोपचारतज्ज्ञ.

Web Title: (Star 895) Surprise, I don't even remember my wife's mobile number!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.