स्टार ९२७ : ऑनलाईन शिक्षण अन्‌ मोबाईलने लावला मुलांना चष्मा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:12+5:302021-07-17T04:20:12+5:30

कोल्हापूर : दीड वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या काेरोनाने जगरहाटीच बदलून टाकली. त्यात सर्वाधिक बदल झाला तो शैक्षणिक वर्तुळात. ज्या ...

Star 927: Online Education and Mobile put glasses on children! | स्टार ९२७ : ऑनलाईन शिक्षण अन्‌ मोबाईलने लावला मुलांना चष्मा!

स्टार ९२७ : ऑनलाईन शिक्षण अन्‌ मोबाईलने लावला मुलांना चष्मा!

Next

कोल्हापूर : दीड वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या काेरोनाने जगरहाटीच बदलून टाकली. त्यात सर्वाधिक बदल झाला तो शैक्षणिक वर्तुळात. ज्या मोबाईलला शाळा, महाविद्यालयात वापरण्यास बंदी होती, त्याच मोबाईलद्वारे शिक्षण देण्याची आणि घेण्याची वेळ कोरोनामुळे आली. शैक्षणिक सत्र वाया जाऊ नये म्हणून अपरिहार्यतेस्तव मोबाईलवर शिक्षण सुरू झाले, पण हेच मोबाईल विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर चष्मा चढवण्यास कारणीभूत ठरल्याने त्यांच्या नेत्ररोग तज्ज्ञांकडील फेऱ्या वाढल्या आहेत.

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मिनिटाला ३० वेळा पापण्यांची उघडझाप होणे, रात्री ६ ते ८ तास व्यवस्थित झोप हाेणे महत्त्वाचे असते, पण कोरोना काळात घरीच बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने लहान शाळक़री मुलांपासून ते महाविद्यालयीन तरुणांचे स्वास्थच या ऑनलाईन शिक्षणाने हिरावून घेतले. डोके जड होणे, डोळे लाल होणे, पाणी येणे, कोरडेपणा जाणवणे, मान व खांदे दुखणे अशा तक्रारी वाढल्या. यातून अनेकांच्या डोळ्यावर चष्माही लागला. अगदीच उमलत्या वयात डोळ्यांचे विकार वाढीस लागणे एक पिढीचे नुकसान करण्यासारखे आहे.

१) डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून...

अ) अँटी ग्लेयर चष्मा वापरावा

ब) संगणक स्क्रीनवर अँटी ग्लेयर ग्लास बसवावी

क) प्रत्येक ऑनलाईन तासिकेनंतर डोळे बंद ठेवून डोळ्यांना थोडा आराम द्यावा

ड) झिरो नंबरचे चष्मे वापरावेत

इ) लाईट सुरु ठेवूनच मोबाईल, कॉम्प्युटर वापरावे

२) लहान मुलांना हे धोके

सतत मोबाईल आणि संगणक वापरल्याने विशेषत: लहान मुलांना जास्त धोके उद्भवतात. त्यांचे नेत्रपट नाजूक असते, त्यावर ताण पडल्यानंतर त्यांची दृष्टी अंधुक होऊ शकते. त्यांना नेत्रपटलाचे इन्फेक्नशनदेखील होऊ शकते. त्यामुळे दर २० मिनिटांनर त्यांना स्क्रीनपासून दूर ठेवून नजर इतरत्र वळवण्यास सांगावे. तरीदेखील डोळे कोरडे पडत असतील, पाणी येत असेल, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

३) डोळ्यांच्या आरोग्यासाठी ट्वेन्टी-ट्वेन्टी फॉर्म्युला

मोबाईल व कॉम्प्युटर स्क्रीन कमीत-कमी वापरणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असले, तरी ती आजच्या युगाची अपरिहार्यता असल्याने योग्यप्रकारे काळजी घेऊन डोळे वाचवणे एवढेच आपल्या हातात. त्यासाठी डॉक्टर ट्वेन्टी-ट्वेन्टी फॉर्म्युला सांगतात. त्यानुसार दर २० मिनिटानंतर २० सेकंद नजर इतरत्र वळवायची. दूरचे पाहाचये, म्हणजे लांबची नजर सुधारते.

४) हे खा, डोळ्यांचे आरोग्य वाढवा

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अ आणि क जीवनसत्त्व आहारातून जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘अ’ जीवनसत्त्व पपई, आंबा, हिरव्या पालेभाज्यांतून मोठ्याप्रमाणावर जाते, तर क जीवनसत्त्वासाठी लिंबू, मोसंबी, संत्रा यासारखी फळे आहारात असणे आवश्यक आहे. कडधान्ये, डाळी, भाज्या जास्त प्रमाणात खाल्ले, तर डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

५) पालकही चिंतेत (पालक प्रतिक्रिया)

माझा मुलगा आता पाचवीत आहे. कोरोनाची साथ आल्यापासून त्याला मोबाईलवरच सगळा अभ्यास शिक्षकांकडून येतो. तास संपेपर्यंत उपस्थित राहावेच लागत असल्याने त्याला कितीही त्रास होत असला तरी ऑनलाईन लेक्चरला बसावेच लागते. अलीकडे त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागल्याचे दिसल्याने रुग्णालयात दाखवले, त्यांनी चष्मा वापरण्या सांगितले.

वेदांत खाडे, बुधवारपेठ, कोल्हापूर

६) डाॅ. अभिजित ढवळे, सहयोगी प्राध्यकी नेत्ररोग विभाग, सीपीआर

जितका स्क्रीन टाईम जास्त तितका डोळे, मान, डोके यावरील ताण वाढत जातो. डोळ्यांचे विकार उद्भवू नयेत म्हणून स्क्रीन टाईम शक्य तेवढी कमी करणे हाच त्यावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. पापण्यांची उघड-झाप, नजर इतरत्र वळवणे, अधून मधून थंड पाण्याचा डोळ्यांवर फवारा मारणे, हे करणे अत्यावश्यक आहे.

Web Title: Star 927: Online Education and Mobile put glasses on children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.