स्टार ९३९ तिसऱ्या लाटेची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:17 AM2021-07-18T04:17:12+5:302021-07-18T04:17:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शुक्रवारी संवाद साधला असता, त्यांनीही तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. यादृष्टीने कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये पॉझिटिव्ह रूग्णसंख्या कमी राहावी, लहान मुलांना लागण कमी व्हावी आणि मृत्यू जास्त होऊ नयेत, यादृष्टीने नियोजन सुरू आहे.
चौकट
पहिली लाट
एकूण रूग्ण ४४,४३८
बरे झालेले रूग्ण ४२,७२९
मृत्यू १,७०९
दुसरी लाट
एकूण रूग्ण १,३२,५५१
बरे झालेले रूग्ण १,२९,१५०
मृत्यू ३,३९२
चौकट
१५ टक्के नागरिकांचेच पूर्ण लसीकरण
लसीकरण तक्ता
लाभार्थी पहिला डोस टक्के दुसरा डोस टक्के
आरोग्य कर्मचारी ११५ ६३
फ्रंटलाईन वर्कर २८० १११
१८ ते ४५ वयोगट १ ०
४५ वर्षांवरील लाभार्थी ६२ २७
६० वर्षांवरील लाभार्थी ७८ ४१
एकूण ३२ १५
चौकट
१७ ठिकाणी ऑक्सिजन प्लान्टची उभारणी
दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यात आता १७ ठिकाणी ऑक्सिजन प्लान्टची उभारणी सुरू आहे. मे आणि जूनमध्ये उच्चांकी ५२ टन प्रतिदिन ऑक्सिजनची गरज भासत होती. आता ही मागणी निम्म्यावर आली आहे. तरीही जुलै महिन्याच्या अखेरीस हे सर्व प्लान्ट कार्यान्वित होतील, असे नियोजन आहे. शासकीय ग्रामीण रूग्णालयांच्या ठिकाणी हे प्लान्ट होत असून, बिद्री साखर कारखान्यानेही प्रकल्प उभारला आहे. तसेच कणेरी मठावरही असा प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. एक हजार अतिरिक्त जम्बो प्राणवायू सिलिंडर व १० ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. ज्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची गरज भागविणे सोयीचे होईल.
चौकट
लहान मुलांसाठी ४३० अतिरिक्त बेड्स
सध्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रूग्णालयांमध्ये ४३० अतिरिक्त आणि ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. बालरोगतज्ज्ञ आणि एनआयसीयूमध्ये काम करणारे डॉक्टर्स आणि परिचारिका यांचे उपचार पध्दतीबाबत प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या सर्व स्थितीचा नव्याने आढावा घेण्यात आला असून, पुन्हा बेड्स वाढविण्यात येणार आहेत.
चौकट
आहे त्याच सेंटर्समध्ये लहान मुलांची सुविधा
लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्यापेक्षा आहे त्याचठिकाणी मुलांची सोय करण्यावर सध्या भर आहे. कारण स्वतंत्र सेंटर केल्यास आणखी मनुष्यबळाची गरज पडते. त्यामुळे सध्याची यंत्रणा वापरूनच याठिकाणी लहान मुलांची सोय करण्यात येणार आहे.
कोट
गेल्या दाेन महिन्यांत तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. १७ ऑक्सिजन प्लांटची उभारणी सुरूच आहे. लहान मुलांसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. सामाजिक संस्थांकडून ४०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देण्यात आले आहेत. जिल्हा रूग्णालय, सेवा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालये याठिकाणी अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर