(स्टार ९५२) बायकोकडून होतोय त्रास, पतींची भरोसा सेलकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:24 AM2021-07-28T04:24:14+5:302021-07-28T04:24:14+5:30

कोल्हापूर : महिलांचे होणारे छळ, अत्याचार, पतीकडून होणारी मारहाण अशा स्वरुपाच्या नेहमीच्या तक्रारी समोर येतातच, त्याबाबत कायदेही तितकेच कडक ...

(Star 952) Harassment from wife, husband's trust, run to cell | (स्टार ९५२) बायकोकडून होतोय त्रास, पतींची भरोसा सेलकडे धाव

(स्टार ९५२) बायकोकडून होतोय त्रास, पतींची भरोसा सेलकडे धाव

Next

कोल्हापूर : महिलांचे होणारे छळ, अत्याचार, पतीकडून होणारी मारहाण अशा स्वरुपाच्या नेहमीच्या तक्रारी समोर येतातच, त्याबाबत कायदेही तितकेच कडक आहेत. पण, आता बायकोकडूनही विविध मार्गाने पतीचा छळ होत असल्याच्या, मारहाण करत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. यासाठी पत्नी पीडित अथवा पुरुष हक्क संघटनेचे कामही सुरु असले तरी ते आणखी प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये महिलांच्या अत्याचारविरोधी तक्रारी दाखल होत असल्या तरीही तेथे पत्नीकडून पतीवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी यंत्रणा सक्रिय आहे.

गेल्या साडेतीन वर्षात बायकोकडून त्रास होत असल्याने न्याय मागण्यासाठी पतींनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे धाव घेतली आहे. अशा सुमारे २५६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यासाठी पती-पत्नी दोघांनाही समोर बसवून त्यातून दोघांच्या सोयीचा मार्ग काढण्यात भरोसा सेलला यश मिळाले आहे. त्यामुळे सुमारे २०० हून अधिक संसार सुरळीत चालले आहेत.

कोरोना कालावधीत व्यवसाय ठप्प झाले, नोकरीला सुट्टी मिळाली, हाताचे काम थांबल्याने पती घरीच राहिले. त्यामुळे पती-पत्नीत सहवास वाढल्याने कौटुंबिक कलह वाढत गेले. त्यामुळे पोलिसांच्या भरोसा सेलकडे पुरुषांनी पत्नीकडून अगर सासुरवाडीकडून होणाऱ्या छळाच्या तक्रारींचा पाढाच मांडला. गेल्या दीड वर्षात कोरोना कालावधीत पत्नी अथवा सासुरवाडीकडून होणाऱ्या त्रासाबद्दल जिल्ह्यातील १०१ पतींनी आपल्या तक्रारी नोंदवल्या. त्यापैकी बहुतांशी निपटारा करण्यात भरोसा सेलला यश आले.

पतींच्या तक्रारी...

१) आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा पत्नीचा हट्ट

२) पतीशी कमी बोलणे व जुन्या मित्रांशी मोबाईलवर जास्त संभाषण करणे

३) सासुरवाडीचे पत्नीचे कान भरतात, त्याप्रमाणे पत्नी वागते, म्हणून वाद होतो

४) वारंवार माहेरी जाणे

५) पत्नीला नाहक शॉपिंगचा शौक महाग पडतो

आर्थिक टंचाई व अति सहवास

कोरोना कालावधीत नोकरी, व्यवसायावर परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे माणूस घरी बसला, त्यामुळे पती-पत्नीत अति सहवास आला. माणूस आर्थिक डबघाईला आलेला असताना खर्चाच्या कारणावरुन पती-पत्नीत वादाचे प्रसंग उद्‌भवले. अक्षरश: किरकोळ कारणांवरुन पती-पत्नीत वाद घडत असल्याचे तक्रारीवरुन दिसते.

मानसिक छळ नव्हे, मारहाणही

भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरुन काही घटनांत पतींचा मानसिक छळच नव्हे तर पत्नीकडून आर्थिक कारणांवरुन मारहाणही होत असल्याच्या तक्रारी

दाखल झाल्या आहेत.

कोरोना काळात तक्रारी घटल्या

जिल्ह्यात पतीवर होणाऱ्या अन्यायाबाबत दर वर्षी किमान १०० च्या दरम्यान तक्रारी भरोसा सेलकडे दाखल होतात, गेल्या दीड वर्षात कोरोना कालावधीत फक्त १०१ तक्रारी दाखल झाल्या.

पत्नी, सासुरवाडीकडून होणाऱ्या छळाच्या तक्रारी

- वर्ष : तक्रारींची संख्या

- २०१८ : १०३

- २०१९ : ५२

-२०२० : ६०

२०२१(दि,१५जुलैपर्यत) : ४१

Web Title: (Star 952) Harassment from wife, husband's trust, run to cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.