स्टार डमी १०५५... खासगी प्रवासी वाहनांची २० टक्के दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:25+5:302021-08-17T04:28:25+5:30
इंधन दरवाढीसह दुरुस्ती, देखभाल खर्चात वाढ सचिन भोसले - लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे सर्वत्र ...
इंधन दरवाढीसह दुरुस्ती, देखभाल खर्चात वाढ
सचिन भोसले - लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे सर्वत्र खासगी प्रवासी वाहनचालकांनीही आपले दर वाढविले आहेत. त्यामुळे विशेष वाहन करून प्रवास करणाऱ्यांना वाढीव प्रती किलोमीटरचे दर २० टक्के अधिकचा अर्थिक फटका बसत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जागतिक तेल बाजारात कच्चे तेल (क्रुड)चे प्रतिबॅरेलचे दर वाढले. त्याचा परिणाम म्हणून पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच गेले. गेल्या चार महिन्यांत तर पेट्रोलने नव्वदी आणि आता काही दिवसांपूर्वी शंभरी पार केली. डिझेलही सध्या ९३ रुपये प्रतिलिटर आहे. तेही येत्या काही दिवसांत शंभरी पार करेल. वाढत्या इंधन खर्चामुळे खासगी प्रवासी वाहनचालकांना प्रती किलोमीटरचे दर वाढविणे गरजेचे बनले . त्यात रस्ते खराब आहेत. मेकॅनिकनीही वाहनांचे सुट्टे भाग महागल्याने त्यांचेही दर वाढवले आहेत. दुरुस्ती, देखभालीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे या वाहनचालकांनी आपले दर २० टक्क्यांनी वाढविले आहेत.
पेट्रोल, डिझेलचे दर असे वाढले
पेट्रोल डिझेल
जानेवारी २०१९ ७४.४४ ६५.७३
जानेवारी २०२० ७४.६५ ६७.८६
जानेवारी २०२१ ८६.३० ७६.४८
ऑगस्ट २०२१ १०७.८३ ९७.८६
वाहनाचा प्रकार प्रती कि.मी. दर
चारचाकी नियमित कार ११ (एसी १२) रुपये
तवेरा, सुमो १३ रुपये
इनोव्हा १५ रुपये
क्रीस्टा व्हीआयपी कार १७ रुपये
कोट
कोरोना संसर्गामुळे वाहन व्यवसायाला उतरती कळा लागली होती. त्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे व्यवसाय मोडकळीस आला आहे. त्यातूनही काहीअंशी शासनाने निर्बंध कमी करून दिलासा दिला आहे. वाहनाचे कर्जाचे हप्ते, दुरुस्ती देखभाल खर्च, इंधन दरवाढीमुळे २० ते २५ टक्के दरवाढ करणे गरजेचे आहे.
महेश गाेवेकर, उपाध्यक्ष, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कार ऑपरेटर्स असोसिएशन
प्रतिक्रिया
इंधनवाढीसह रस्ते खराब असल्याने दुरुस्ती, देखभालीचाही खर्च वाहन मालकांवर बसत आहे. त्यामुळे प्रती कि.मी. दरवाढ करणे गरजेची बाब बनली आहे. कोरोनामुळे बँकांचे कर्जही थकल्याने हप्ते अंगावर आहेत.
विजय पोवार, खासगी वाहन मालक