रुग्णसेवक प्रशिक्षण केंद्रे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:13+5:302021-06-28T04:18:13+5:30
जयसिंगपूर : इंडियन मेडिकल असोसिएशन व आय. एम. ए. व जे. एम. ए. या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी ...
जयसिंगपूर : इंडियन मेडिकल असोसिएशन व आय. एम. ए. व जे. एम. ए. या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपापल्या परिसरात नर्सिंगचे कोर्स सुरू करावेत. राज्यातील नर्सिंग कर्मचा-यांची भासणारी कमतरता या समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिल्या. तर डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी इंडियन मेडिकल असोशिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी मंत्री यड्रावकर यांच्याकडे केली.
आयएमएच्या पदाधिका-यांनी डॉ. एस. के. पाटील सभागृहात मंत्री यड्रावकर यांची भेट घेतली. यावेळी कोविड योद्धे डॉक्टर कवच विमानुसार ५० लाख रुपये त्वरित मिळावेत, अशी मागणी आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. लोंढे यांनी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांचा मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, डॉ. अकलंक चोगले, डॉ. विक्रम जैन, डॉ. अमर मोरे, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. रियाज अत्तार, डॉ. राजेंद्र आलासे, डॉ. अनिल तकडे, डॉ. शोभा निटवे, डॉ. चिडगुपकर, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. संतोष खडतरे, डॉ. सविता पाटील, डॉ. माधवी पटवर्धन उपस्थित होते. स्वागत डॉ. अतिक पटेल तर डॉ. अतुल घोडके यांनी आभार मानले.
फोटो - २७०६२०२१-जेएवाय-१०
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.