आजऱ्यात आधारभूत किमतीनुसार भात खरेदीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:36+5:302021-02-06T04:44:36+5:30

मार्केटिंग फेडरेशनने आजरा तालुका किसान भात खरेदी-विक्री संघाला आधारभूत दरानुसार भात खरेदीची परवानगी दिली आहे. आजपर्यंत या केंद्रावर २८ ...

Start buying paddy at basic price in Ajmer | आजऱ्यात आधारभूत किमतीनुसार भात खरेदीला सुरुवात

आजऱ्यात आधारभूत किमतीनुसार भात खरेदीला सुरुवात

Next

मार्केटिंग फेडरेशनने आजरा तालुका किसान भात खरेदी-विक्री संघाला आधारभूत दरानुसार भात खरेदीची परवानगी दिली आहे. आजपर्यंत या केंद्रावर २८ शेतकऱ्यांकडून ४०० क्विंटल भाताची खरेदी केली आहे.

७७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भाताचा ओलसरपणा तपासूनच भाताची खरेदी केली जात असल्याचे यावेळी नामदेव नार्वेकर व सूर्यकांत नार्वेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भात खरेदी केंद्राबाबतची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार विकास अहिर, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम, भाग्यश्री पवार, महादेव पोवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. नामदेव नार्वेकर यांनी आभार मानले.

-----------------------

* खरेदी केलेल्या भाताचे बिल सोमवारी खात्यावर

भात खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या भाताची आधारभूत किमतीनुसारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून जमा केली जाणार आहे. योग्य वजन व कोणतीही शेतकऱ्यांची फसवणूक खरेदी केंद्रावर होत नसल्याचे ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.

-----------------------

* हिरव्या सोन्याला २५६८ रुपयांचा दर

आजरा तालुक्यातील पाऊस, हवामान, जमिनीतील कसदारपणा यामुळे तालुक्यातील तांदळाला चवदारपणा आहे. शेतकऱ्यांना आधारभूत किमतीनुसार क्विंटलला १८६८ रुपये दर व बोनस म्हणून ७०० रुपये अशी एकूण २५६८ रुपये मिळतात. तालुक्यातील हिरव्या सोन्याला चांगला दर मिळाला आहे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

--------------------------

फोटो ओळी : आजऱ्यातील भात खरेदी केंद्रात भात पोत्यांच्या पूजनप्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई, शेजारी ज्ञानदेव वाकुरे, नामदेव नार्वेकर आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०५०२२०२१-गड-०२

Web Title: Start buying paddy at basic price in Ajmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.