मुरगूडात दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:30+5:302021-07-10T04:17:30+5:30

कागल तालुक्यामध्ये एकूण ८४ गावे आहेत. त्यातील ५७ गावे मुरगूड पोलीस ठाण्याच्या तर ३७ गावे कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ...

Start a civil and criminal court in Murguda | मुरगूडात दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू करा

मुरगूडात दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू करा

Next

कागल तालुक्यामध्ये एकूण ८४ गावे आहेत. त्यातील ५७ गावे मुरगूड पोलीस ठाण्याच्या तर ३७ गावे कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतात.कागल पोलीस ठाणे व मुरगूड पोलीस ठाण्याकरीता कागल येथे दोन वेगवेगळी दिवाणी व फौजदारी न्यायालय आहेत . मुरगूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५७ गावांकरीता कागल शहरामध्ये वेगळे न्यायालय आहे. या ५७ गावांतील नागरिकांना दिवाणी व फौजदारी न्यायालयीन कामकाजासाठी कागल येथे जावे लागते.

कागल शहर मुरगूड शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे तसेच अन्य गावांपासून ६० ते ७० कि.मी अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांना कोर्ट कामाकरिता कागल शहरामध्ये येण्या-जाण्याकरिता वेळ, पैसा व नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी मुरगूड पोलीस ठाणे हद्दीतील ५७ गावांकरिता कागल येथे असलेले दिवाणी व फौजदारी न्यायालय नागरिकांच्या सोयीकरीता मुरगूड शहरामध्ये सुरू करावे, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .

या मागणीचे निवेदन खासदार मंडलिक यांना देताना सानिका फौडेशनचे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, चिमगावचे उपसरपंच अनिल आंगज, सागर सापळे, नंदकिशोर खराडे, तुषार साळुखे, सुशा॑त मागोरे, विनायक मुसळे, ऋतुराज शिंदे, सूरज मुसळे, ओंकार म्हेतर, अरविंद मोरबाळे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ :- दिवाणी व फौजदारी न्यायालय मुरगूड शहरामध्ये सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन खासदार संजय मंडलिक यांच्याकडे देताना येथील सानिका फौंडेशनच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी,चिमगावचे उपसरपंच अनिल आंगज,आदी

Web Title: Start a civil and criminal court in Murguda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.