कोरोनाचे नियम पाळून दहावी, बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:08+5:302021-06-30T04:16:08+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी मागणी कोल्हापूर शहर ...
कोल्हापूर : कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने मंगळवारी केली. त्याबाबतचे निवेदन या समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले.
सध्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. मोबाईलची उपलब्धता, नेटवर्क नसणे, आदी अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना करावा लागत आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्याची दखल घेऊन कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून दहावी, बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात यावेत. त्यासाठी २० किंवा २५ विद्यार्थ्यांची एक बॅच करण्यात यावी. एका बेंचवर एका विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था करण्यात यावी. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळातील विद्यार्थिनींनी ऑनलाइन शिक्षणातील अडचणी मांडल्या. त्यावर या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण उपसंचालक सोनवणे यांनी दिले. या वेळी समितीचे रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, श्रृती जाधव, साक्षी जाधव, धिरीजा मोरे, ऐश्वर्या डोंगरसाने, विभावरी सुतार, अजित सासने, भाऊ घोडके, अंजूम देसाई, लहुजी शिंदे, प्रमोद पुगांवकर, पंपू सुर्वे, शिरीष शिंदे उपस्थित होते.
चौकट
परीक्षा रद्द करू नका
या शैक्षणिक वर्षामध्ये राज्य आणि केंद्र शासनाने कोणत्याही परिस्थितीत दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करू नयेत. त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी या समितीने केली आहे.
फोटो (२९०६२०२१-कोल-शिक्षण निवेदन) : कोल्हापुरात मंगळवारी ऑनलाइन शिक्षणातील अडचणी मांडत दहावी, बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची मागणी विद्यार्थिनींनी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्याकडे केली. या वेळी कोल्हापूर शहर नागरी कृती समितीतील सदस्य उपस्थित होते.
===Photopath===
290621\29kol_2_29062021_5.jpg
===Caption===
फोटो (२९०६२०२१-कोल-शिक्षण निवेदन) : कोल्हापुरात मंगळवारी ऑनलाईन शिक्षणातील अडचणी मांडत दहावी, बारावीचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्याची मागणी विद्यार्थीनींनी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्याकडे केली. यावेळी कोल्हापूर शहर नागरी कृती समितीतील सदस्य उपस्थित होते.