गडहिंग्लजचा आठवडी बाजार सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:44+5:302021-08-26T04:25:44+5:30
गडहिंग्लज : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असणारा गडहिंग्लजचा आठवडी बाजार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेने मुख्याधिकारी नागेंद्र ...
गडहिंग्लज : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असणारा गडहिंग्लजचा आठवडी बाजार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेने मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे, लाॅकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील शेतकरी, भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, व्यापारी आणि फेरीवाल्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गडहिंग्लजसह आजरा व चंदगड तालुक्यातील आणि सीमाभागातील मोठी बाजारपेठ म्हणून गडहिंग्लजच्या आठवडी बाजाराची ओळख आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. त्यामुळे नियमावली घालून बाजार सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. निवेदनावर, शिवसेना उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, अनिल खवरे, प्रशांत घबाडे, अनिकेत चव्हाण, पवन नाईक, अनिल मदकरी, मोहन नाईक, तेजस घेवडे, वृषभ घबाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना काशिनाथ गडकरी यांनी निवेदन दिले. यावेळी नील खवरे, प्रशांत घबाडे, अनिकेत चव्हाण, पवन नाईक, अनिल मदकरी, मोहन नाईक, तेजस घेवडे, वृषभ घबाडे आदी उपस्थित होते.
क्रमांक : २५०८२०२१-गड-०३