नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाजारपेठा सुरू करा : शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:26+5:302021-07-07T04:31:26+5:30

कोल्हापूर : कोराेना पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या धर्तीवर जिल्ह्यातील १२ नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाजारपेठा सुरू कराव्यात, अशी मागणी ...

Start markets in municipal areas: Shetty's demand to CM | नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाजारपेठा सुरू करा : शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाजारपेठा सुरू करा : शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next

कोल्हापूर : कोराेना पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या धर्तीवर जिल्ह्यातील १२ नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाजारपेठा सुरू कराव्यात, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी पत्राद्वारे केली. यात इचलकरंजी, जयसिंगपूर, पेठवडगाव, गडहिंग्लज, आजरा, हुपरी, शिरोळ, कुरुंदवाड, मलकापूर, कागल या नगरपालिकांसह बांबवडे, गांधीनगर या मोठ्या बाजारपेठा असलेल्या शहरांचा समावेश आहे.

इचलरकरंजी व गांधीनगरमध्ये तर बाजारपेठ खुली व्हावी म्हणून व्यापाऱ्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याची दखल घेत शेट्टी यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असे पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी महानगरपालिकातील व्यवहार सुरू करताना नगरपालिका कार्यक्षेत्रांना वगळणे हा दुजाभाव असल्याकडे लक्ष वेधले आहे. शिवाय या नगरपालिकांचा पॉझिटिव्ह दर ७ ते ८ टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याने त्यांनाही निर्बंधांतून मुक्तता मिळणे गरजेचे आहे. तीन महिन्यांपासून व्यापारपेठा बंद असल्याने विक्रेते व कामगार, खरेदीदार यांना मोठा फटका बसू लागला आहे. इचलकरंजी शहरात तर १५ हजारांवर छोटे-मोठे उद्योग आहेत. यावर अवलंबून असणाऱ्या लाखो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेऊन विस्कटलेला व्यापार रुळावर आणावा, अशी मागणीही केली आहे.

Web Title: Start markets in municipal areas: Shetty's demand to CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.