वैद्यकीय व आरोग्यविषयक महाविद्यालये सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:11+5:302021-09-16T04:30:11+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व आरोग्यविषयक महाविद्यालये कोरोना नियमांचे पालन करत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व आरोग्यविषयक महाविद्यालये कोरोना नियमांचे पालन करत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी दिले. त्यासाठी ५० टक्क्यांपेक्षा कमी आसन क्षमतेचा वापर व सर्वांचे थर्मल स्क्रिनिंग व शिक्षक-कर्मचाऱ्यांचे लसीकरण या अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजर्षी शाहू व डॉ.डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, ताप, सर्दी, खोकला ही कोरोनासदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देऊ नये, तसेच पेन, मोबाइल व इतर शैक्षणिक साहित्य एकमेकांनी हाताळू नयेत. प्रवेशद्वार, बैठक कक्ष, बाथरूम, प्रसाधनगृह येथे साबण व सॅनिटायझर्स ठेवावे आणि प्रशिक्षणाचे ठिकाण रोज व तास पूर्ण झाल्यावर निर्जंतुक करावे, तसेच १८ वर्षांवरील पात्र प्रशिक्षणार्थ्यांचे आठ दिवसांच्या आत लसीकरण करून घ्यावे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
---