धामोड येथे मिनी कोविड सेंटर सुरू करा : आमदार प्रकाश आबिटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:17+5:302021-07-21T04:17:17+5:30
धामोड व राधानगरीदरम्यानचे अंतर लांब असल्याने रुग्णांची व त्याचबरोबर नातेवाईकांची मोठी फरफट होत आहे. ही फरफट थांबविण्यासाठी ज्या रुग्णांचे ...
धामोड व राधानगरीदरम्यानचे अंतर लांब असल्याने रुग्णांची व त्याचबरोबर नातेवाईकांची मोठी फरफट होत आहे. ही फरफट थांबविण्यासाठी ज्या रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत व ज्यांना कोणताही त्रास नाही, अशा रुग्णांना धामोड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये अथवा मराठी शाळेमध्ये स्वतंत्र अलगीकरणात दाखल करून घ्यावे. ज्या रुग्णांमध्ये केविडची तीव्र लक्षणे आहेत, अशांनाच राधानगरी कोविड सेंटरला पाठवावे. गावातील रुग्ण गावातच राहिल्याने त्यांच्यावरील मानसिक ताण व दडपणही कमी होऊन असे रुग्ण लवकरात लवकर कोविडमुक्त होतील. त्यामुळे त्यांना गावातच कोविड केंद्र उभारून सेवा द्यावी, असे आवाहन या बैठकीत बोलताना त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केले.
या आढावा बैठकीस सरपंच अशोक सुतार, उपसरपंच प्रशांत पोतदार, सर्व ग्रा.पं. सदस्य, वैद्यकीय अधिकारी वैष्णवी कापसे, दीपिका शेनॉय, ग्रामसेवक एल. एस. इंगळे, आरोग्य सहायक के .के. पाटील, पोलीस पाटील महादेव फडके, के. एच. ठिपकुर्ले, के. एल. बोरनाक आदी उपस्थित होते
फोटोओळी
धामोड (ता .राधानगरी ) येथील कोरोना आढावा बैठकीत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर, ग्रामसेवक एल .एस. इंगळे, वैद्यकीय अधिकारी वैष्णवी कापसे, दीपिका शेनॉय आदी.