कोल्हापुरात चिल्लर पार्टीच्या समांतर चित्रपट चळवळीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 07:35 PM2017-08-06T19:35:29+5:302017-08-06T19:36:36+5:30
कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीतर्फे बालचित्रपट चळवळीबरोबरच आता मोठ्यांसाठी समांतर चित्रपट चळवळीस रविवारी प्रारंभ करण्यात आला. या चळवळीअंतर्गत दाखविण्यात आलेल्या पहिल्याच चित्रपटास उदंड प्रतिसाद मिळाला. बर्थ आॅन नेशन हा सत्य घटनेवर आधारीत चित्रपटाने या चळवळीला कोल्हापुरात प्रारंभ झाला.
कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीतर्फे बालचित्रपट चळवळीबरोबरच आता मोठ्यांसाठी समांतर चित्रपट चळवळीस रविवारी प्रारंभ करण्यात आला. या चळवळीअंतर्गत दाखविण्यात आलेल्या पहिल्याच चित्रपटास उदंड प्रतिसाद मिळाला. बर्थ आॅन नेशन हा सत्य घटनेवर आधारीत चित्रपटाने या चळवळीला कोल्हापुरात प्रारंभ झाला.
लहान मुलांमध्ये देश-विदेशांतील चित्रपट पाहण्याची आवड जोपासावी म्हणून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत बालचित्रपट दाखविण्यात येतात. याला यश मिळाल्यानंतर माणसाने माणसाशी माणसासारखे वागो असा हेतू घेउन ही समांतर चित्रपटाची चळवळ चिल्लर पार्टीतर्फे सुरु करण्यात आली.
साळोखेनगर येथील कोपार्डेकर शाळेत रविवारी समांतर चित्रपट चळवळीला बळ देण्यासाठी अनेक चित्रपट रसिकांनी उपस्थिती लावली.
ज्येष्ठ रंगकर्मी पवन खेबुडकर यांच्या हस्ते या चळवळीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाकर आरडे, कोपार्डेकर शाळेचे संस्थापक मिलिंद कोपार्डेकर, डॉ. अनमोल कोठडिया, रविंद्र शिंदे, टी. आर. गुरव, भोजने, चंद्रकांत निकाडे, सुधाकर सावंत, मिलिंद नाईक उपस्थित होते.
पवन खेबुडकर यांनी समांतर चित्रपट चळवळीमुळे चित्रपट पाहण्याच्या अभिरुचीत बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन या चळवळीला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभाकर आरडे यांनीही या समांतर चित्रपट चळवळीला भरभरुन प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांनी एेंशीच्या दशकात थांबलेल्या या समांतर चित्रपट चळवळीमुळे नव्या चळवळीला प्रारंभ होईल. मानवी समाजाला काळिमा फासणाºया इतिहासकाली घटनांची पुनरावृत्ती होउ नये, म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयत्न सुरु आहेत. स्वार्थीपणा, ढोंंगीपणा, भ्रष्टाचार, धर्मवाद, दहशतवाद या मुळे समाज पोखरुन निघाला आहे, अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी चित्रपट माध्यमातील चांगल्या चित्रपटांची अभिरुची उपयोगात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गुलामांना स्वातंत्र्यप्राप्तीची आशा दाखविणाºया नेट टर्नर या साक्षर गुलामाच्या उद्रेकाचा आणि एका देशाच्या जन्माची कथा सांगणारा हा सत्य घटनेवरील आधारित २0१६ मधील चित्रपट यावेळी दाखविण्यात आला.