धामणी खोऱ्यात रोप लावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:35+5:302021-07-15T04:17:35+5:30
धामणी खोऱ्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर भात पीक घेतले जात असून, ते रोप लागण पद्धतीने घेतले जाते. मृग नक्षत्रात पावसाचे ...
धामणी खोऱ्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर भात पीक घेतले जात असून, ते रोप लागण पद्धतीने घेतले जाते.
मृग नक्षत्रात पावसाचे जोरदार आगमन झाल्यामुळे भात पेरणीची कामे वेळेत झाली होती; मात्र ऐन भातरोप लागणीच्या वेळी पावसाने दडी मारल्यामुळे भातरोप लागणीच्या कामांसह अन्य मशागतीची कामे खोळंबली होती. गेले दोन आठवडे तर कडक ऊन पडल्यामुळे भाताच्या तरव्यासह पाण्यावर लावलेली रोप लागण ही वाळू लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात पावसाने दमदारपणे सुरुवात केली असून, भात रोप लागणीसह नाचणी, वरई मांडणीची कामे ही जोमाने पुन्हा सुरू झाली आहेत. पावसाच्या दमदार सुरुवात त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.