शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीस लागा, संभाजीराजे यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 02:09 PM2022-10-14T14:09:44+5:302022-10-14T14:10:57+5:30

आगामी वर्षात २०२३ साली शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३४९ वर्षे पूर्ण होत आहेत

Start preparing for the coronation ceremony of shivrajyabhishek, Sambhaji Raje suggestion | शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीस लागा, संभाजीराजे यांची सूचना

संग्रहित फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : आगामी वर्षात २०२३ साली शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३४९ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता आतापासूनच तयारी सुरू करण्यात यावी, अशी सूचना माजी खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी केली. नवी दिल्लीत भारतीय पुरातत्त्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी यांच्यासमवेत बैठक झाली. दुर्गराज रायगड येथे सुरू कामांबाबत चर्चा झाली.

संभाजीराजे म्हणाले, रायगडाच्या राजसदरेवरील काँक्रिटचा थर पुरातत्व विभागाने काढला आहे, मात्र ,गेली कित्येक आठवडे त्यावर कोणतेही काम केलेले नाही. हे काम तत्काळ सुरू करून राजसदरेचे संवर्धन प्राथमिकतेने पूर्ण करावे. सिंहासन चौथऱ्यावरील सिमेंट काँक्रिटचा थर काढून त्याचे ऐतिहासिक स्वरूप परत खुले करावे. रायगड प्राधिकरणाने पुरातत्व विभागास संवर्धन कामांसाठी निधी दिला आहे. त्या निधीतून पुरातत्व विभागाने गडावर उत्खनन करायचे आहे. मात्र, या निधीतून केवळ वीस टक्केच काम झाले असून गडावर लवकरच उत्खनन व संवर्धन कार्य सुरू करावे.

होळीचा माळ येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस रायगड विकास प्राधिकरणकडून ऐतिहासिक स्वरूपाचे छत्र बसविले जाणार असून त्याकरिता प्राधिकरणास मान्यता मिळालेली आहे. या परिसराचे सुशोभिकरण पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असून पुरातत्त्व विभागाने ही प्रकिया तत्काळ सुरू करावी, असा निर्णय बैठकीत झाला.

गडावर येण्याचे शुल्क रद्द करा..

रायगड प्राधिकरण अंतर्गत मटेरियल रोप वे व स्टेट ऑफ दी आर्ट दर्जाचा प्रवासी रोप वे सुरू करण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात यावी. पुरातत्त्व विभागामार्फत गडावर येण्यासाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करावे, ही मागणी संभाजीराजे यांनी केली.

Web Title: Start preparing for the coronation ceremony of shivrajyabhishek, Sambhaji Raje suggestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.