रखडलेली प्राध्यापक भरती सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:37 AM2020-12-14T04:37:43+5:302020-12-14T04:37:43+5:30
कोपार्डे : गेली अनेक वर्षे रखडलेली प्राध्यापक भरती सुरू करण्यासाठी नवनिर्वाचित शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना नेट-सेट व ...
कोपार्डे : गेली अनेक वर्षे रखडलेली प्राध्यापक भरती सुरू करण्यासाठी नवनिर्वाचित शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना नेट-सेट व पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
कुडित्रे (ता. करवीर) येथे श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज येथे आ. प्रा. आसगावकर यांची भेट घेऊन प्रा.डॉ उज्ज्वला बिरंजे यांच्या नेतृत्वाखाली नेटसेट व पीएच.डी.धारक संघर्ष समितीने हे निवेदन दिले.
या निवेदनात शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी, समान काम समान वेतन, २०० बिंदू नामावली, थकीत सीएचबी मानधन असे प्रश्न रखडल्यामुळे अनेकांच्यावर अन्याय होत आहे. हे प्रश्न आपण आमदार म्हणून मार्गी लावावे, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी, प्राध्यापक भरतीसाठी आपण विधान परिषदेत मागणी लावून धरणार आहे. आपली उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी प्राध्यापक भरतीविषयी चर्चा झालेली आहे. मंत्री सामंत यांनी याबाबत आठ दिवसांत बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. येत्या काही दिवसांत यावर ठोस निर्णय होणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे प्रा. राहुल भास्कर, प्रा. संदीप हरंगाने, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. चौगुले, प्रा. सचिन कामत, प्रा. प्रकाश पाटील, प्रा. सौरभ पाटणकर, प्रा. एफ. एन. पटेल, प्रा. अजय कांबळे, प्रा. चारुशीला तासगवे उपस्थित होते.
(फोटो)
कुडित्रे (ता. करवीर) येथे श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज येथे आ. प्रा. आसगावकर यांची भेट घेऊन प्रा.डॉ. उज्ज्वला बिरंजे यांच्या नेतृत्वाखाली नेटसेट व पीएच.डी.धारक संघर्ष समितीने हे निवेदन दिले.