शिरढोणमधील शाळा सुरु करा अन्यथा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:39+5:302021-09-04T04:27:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शिरढोण (ता. शिरोळ) येथील रमजानशेठ बाणदार विद्यालय येथील शाळा बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शिरढोण (ता. शिरोळ) येथील रमजानशेठ बाणदार विद्यालय येथील शाळा बंद आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोरोना संसर्ग कमी झाल्याने शाळेचे वर्ग सुरु करावेत अन्यथा मंगळवारी (दि. ७) मोर्चा काढण्याचा इशारा लालबावटा शेतमजूर युनियनचे तालुकाध्यक्ष हैदराबादअली मुजावर यांनी मुख्याध्यापक सिकंदर मुजावर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान, शाळा सुरू करण्याबाबत आम्हाला अद्याप शासनाचे आदेश नाहीत. शासन आदेश मिळाल्यास शाळा सुरू करण्यात येईल, असे मुख्याध्यापक मुजावर यांनी सांगितले. शाळा कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील शाळा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. गावातील प्राथमिक शाळाही सुरु आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या इतर गावातील शाळा सुरु असताना या गावातीलच रयतची शाळा बंद का आहे, असा प्रश्न उपस्थित करुन सोमवारपर्यंत शाळा सुरू न केल्यास पालक आणि विद्यार्थांना घेऊन शाळेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावेळी अविनाश कांबळे, बबन मगदूम, प्रकाश कांबळे उपस्थित होते.
फोटो - ०३०९२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर. बी. विद्यालयाचे मुख्याध्यापक सिकंदर मुजावर यांना हैदरअली मुजावर यांनी निवेदन दिले.