जयसिंगपूरसह परिसरातील शाळा सुरू करा -संभाजी ब्रिगेडचे गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:42+5:302021-09-03T04:24:42+5:30
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अठरा महिन्यांपासून कोरोनाच्या कारणास्तव राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून ...
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अठरा महिन्यांपासून कोरोनाच्या कारणास्तव राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून पूर्ण वंचित आहेत. शिक्षण सुरू नसल्यामुळे मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही थोतांड असून त्याचा मुलांना काहीही उपयोग होत नाही. कोरोना काही प्रमाणात कमी झाल्याने राज्यामध्ये सर्व व्यवहार सुरू आहेत. रेल्वे, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, दुकाने यांसह राजकीय पक्षांचे मेळावे सुरू आहेत. मग शाळा का बंद ठेवल्या जात आहेत, असा प्रश्न जनतेला पडला आहे. याशिवाय राज्यातील काही भागातील शाळा नियमितपणे सुरू आहेत येथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र आपल्या परिसरातील शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होत आहे. त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याप्रसंगी अक्षय पाटील, तुषार भोसले, आकाश खोत, इकबाल सुदरणे, रोहन कोटलगी, अमोल संकपाळ, अजय कोळी उपस्थित होते.