श्रावण षष्ठी यात्रेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:20+5:302021-08-14T04:29:20+5:30
श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर आज होणारी चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने दुसऱ्या ...
श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर आज होणारी चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने दुसऱ्या वर्षीही यात्रा रद्द केली.
मंदिरातील धार्मिक विधी मात्र मोजक्या पुजार्यांच्या उपस्थितीत पार पडले. भाविकाविना जोतिबा मंदिर परिसरात शुकशुकाट होता. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. जोतिबा डोंगरच्या प्रमुख प्रवेश मार्गावर पोलिसाच्या छावण्या तैनात होत्या. शुक्रवार ते रविवार या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केला असून जोतिबा डोंगरावर भाविकांना येण्यास बंदी घातली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने दुसऱ्या वर्षीही यात्रा रद्द केली आहे. भाविकांनी घरातूनच जोतिबा दर्शन घेऊन षष्ठी उपवास केला. यात्रा रद्द झाल्यामुळे जोतिबा मंदिर परिसरात भाविकांविना शुकशुकाट होता. चांगभलंचा गजर नाही. गुलाल, खोबऱ्यांची उधळण नाही. व्यापारपेठ बंद होती. दरम्यान, मंदिरातील सर्व धार्मिक विधी मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडली. शनिवारी सकाळी ६.३० वाजता धुपारती सोहळ्याने षष्ठी यात्रेची सांगता होणार आहे.
फोटो : १) श्रावण षष्ठीनिमित्त श्री चोपडाई देवीची बांधण्यात आलेली उत्सव महापूजा.