मुख्याध्यापक संघाकडून ऑनलाईन शिक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:23 AM2020-07-07T11:23:27+5:302020-07-07T11:25:57+5:30
कोल्हापूर येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले.
कोल्हापूर : येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले.
स्थानिक वृत्तवाहिन्या बी न्यूज, एसपीएन एस न्यूज चॅनेलवरून या शैक्षणिक उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळेतील तज्ज्ञ विषय शिक्षक टीव्हीवर मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांनी आपापल्या विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी केले.
बी न्यूज चॅनेलवर सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत, तर एसपीएन एस न्यूजवर सोमवार ते शनिवार दरम्यान रोज सायंकाळी ६ ते ७ यावेळेत पाठांचे प्रसारण होईल. या उपक्रमात ज्या तज्ज्ञ शिक्षकांना सहभागी व्हावयाचे आहे, त्यांनी मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सचिव दत्ता पाटील यांनी केले.