तिलारी मत्स्यबीज केंद्र सुरू करा : तिलारी मत्स्यबीज केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:41 AM2021-02-18T04:41:45+5:302021-02-18T04:41:45+5:30

चंदगड : तिलारीनगर (ता. चंदगड) येथे गेली २४ वर्षे अपूर्णावस्थेत असलेले मत्स्यबीज केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी मुंबई-सह्याद्री अतिथिगृहात मत्स्यपालन ...

Start Tilari Fish Seed Center: Start Tilari Fish Seed Center | तिलारी मत्स्यबीज केंद्र सुरू करा : तिलारी मत्स्यबीज केंद्र सुरू करा

तिलारी मत्स्यबीज केंद्र सुरू करा : तिलारी मत्स्यबीज केंद्र सुरू करा

Next

चंदगड : तिलारीनगर (ता. चंदगड) येथे गेली २४ वर्षे अपूर्णावस्थेत असलेले मत्स्यबीज केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी मुंबई-सह्याद्री अतिथिगृहात मत्स्यपालन मंत्री अस्लम शेख यांच्यासोबत बैठक पार पडली. आमदार राजेश पाटील यांनी यावेळी मंत्री शेख यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

तिलारी मत्स्यबीज केंद्र चालू झाले तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील जलाशयाच्या मत्स्य ठेकेदारांना व मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मत्स्यबीज सहज उपलब्ध होईल. तसेच मत्स्यव्यवसायमध्ये नवीन येणाऱ्या तरुणांना जिल्ह्यातच मत्स्यबीज उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढेल व तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होतील. सद्य:स्थितीत बेळगाव, हुबळी, कोल्हापूर, सांगली हे मत्स्यबाजार उपलब्ध आहेत. यामुळे यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून तिलारी मत्स्यबीज केंद्र तत्काळ चालू करावे, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली.

यावेळी जिल्ह्यातील जवळपास ६५ पाटबंधारे व जलसंधारण खात्याच्या जलाशयाच्या माध्यमातून जवळपास ५००० ते ६००० हेक्टर जमिनीत पाणी साठविले जाते. याचबरोबर जिल्हा परिषदेचेसुद्धा १५० तलाव आहेत.

मंत्री शेख यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने केंद्र चालू करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी मत्स्य उपसचिव श्रीनिवास शास्त्री, आयुक्त आर. आर. जाधव, कोल्हापूर साहाय्यक आयुक्त प्रवीण सुर्वे, सहआयुक्त मुंबई राजेंद्र जाधव, प्रादेशिक उपायुक्त - पुणे विभाग अभय देशपांडे, तिलारी केंद्राचे साहाय्यक अधिकारी सतीश खाडे, उपायुक्त युवराज चौगुले उपस्थित होते.

* फोटो ओळी : मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात तिलारी मत्स्यबीज केंद्रासंदर्भात मंत्री अस्लम शेख यांच्याशी चर्चा करताना आमदार राजेश पाटील. यावेळी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

क्रमांक : १७०२२०२१-गड-०३

Web Title: Start Tilari Fish Seed Center: Start Tilari Fish Seed Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.