शिवाजी विद्यापीठात वृक्षलागवडीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:14 PM2019-07-01T18:14:43+5:302019-07-01T18:17:20+5:30
राज्यशासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेसंदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिसरात सोमवारी वृक्षलागवड मोहिमेला प्रारंभ केला. मोहिमेअंतर्गत विद्यापीठात ४00 रोपे लावण्यात येणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
कोल्हापूर : राज्यशासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेसंदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिसरात सोमवारी वृक्षलागवड मोहिमेला प्रारंभ केला. मोहिमेअंतर्गत विद्यापीठात ४00 रोपे लावण्यात येणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
दरवर्षी विद्यापीठ परिसराच्या निरनिराळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावून संपूर्ण परिसरामधील हिरवे क्षेत्र वाढविण्याकडे विद्यापीठ प्रशासनाने लक्ष पुरविले आहे. यंदाही विद्यापीठाने वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ केला असून, सोमवारी सकाळी आठ वाजता विद्यापीठाच्या मेघनाथ नागेशकर क्रीडासंकुल परिसरात प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते कडुलिंब रोप लागवड मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, अधीक्षक ए. के. जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिक या मोहिमेत सहभागी झाले.