कोल्हापुरात कोव्हॅक्सिन लस देण्यास प्रारंभ, दिवसभरात सहाजणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 07:32 PM2020-12-22T19:32:52+5:302020-12-22T19:37:37+5:30
CoronaVirus kolhapurnews-राज्य शासनाकडून लस देण्यास परवानगी मिळाल्याने मंगळवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. दिवसभरामध्ये सहाजणांना लस टोचण्यात आली आहे. अशा पद्धतीने एक हजार स्वयंसेवकांना लस टोचण्यात येणार आहे.
कोल्हापूर : राज्य शासनाकडून लस देण्यास परवानगी मिळाल्याने मंगळवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. दिवसभरामध्ये सहाजणांना लस टोचण्यात आली आहे. अशा पद्धतीने एक हजार स्वयंसेवकांना लस टोचण्यात येणार आहे.
गेले चार दिवस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या परवानगीसाठी वाट पाहिली जात होती. त्यामुळे रोज लसचाचणी होणार असे वातावरण होते. मात्र प्रत्यक्षात परवानगी मिळत नव्हती. अखेर मंगळवारी सकाळी या परवानगीचा मेल महाविद्यालयाच्या प्रशासन विभागाला प्राप्त झाला.
त्यानुसार मंगळवारी दुपारी या प्रक्रियेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुनीता रामानंद आणि क्रोम या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख डॉ. धनंजय लाड, औषधवैद्यकशास्त्र विषयाचे प्रा. बरगे, यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. सीपीआरमध्ये या संस्थेला जागा देण्यात आली आहे. याच ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली.