ज्योतिर्लिंग कॉलनी - जरगनगर रस्त्यावरील पुलाचे काम तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:45+5:302021-05-29T04:18:45+5:30
कोल्हापूर : येथील ज्योतिर्लिंग कॉलनी - जरगनगर रस्त्यावरील पुलाच्या कामाची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी ...
कोल्हापूर : येथील ज्योतिर्लिंग कॉलनी - जरगनगर रस्त्यावरील पुलाच्या कामाची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी केली. या पुलाचे काम तत्काळ सुरू करावे ,असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले. मंत्री पाटील आणि आमदार पाटील यांनी नगरोत्थान योजनेतून १ कोटी २० लाख रुपये निधी या कामासाठी दिला आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ७८ रायगड कॉलनी-जरगनगर या प्रभागातील ज्योतिर्लिंग कॉलनी जरगनगर रस्त्यावरील पूल सन २०१९ मधील अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. हा पूल लवकर पुन्हा बांधावा ,अशी मागणी या भागातील नागरिकांची होती. त्यानुसार माजी नगरसेविका अश्विनी रामाणे आणि मधुकर रामाणे यांनी या पुलाच्या कामासाठी पालकमंत्री पाटील आणि आमदार पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार या पुलाच्या कामासाठी त्यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे. पुलाच्या कामाची पाहणी पालकमंत्री पाटील आणि आमदार पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले यांच्यासमवेत केली. यावेळी त्यांनी आवश्यक सूचना करून या पुलाचे काम तत्काळ काम सुरु करावे अशी सूचना केली. यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, रामकृष्ण ठाकूर, अशोक कुलकर्णी, सुधीर चरणकर, युवराज गुरव, आदी उपस्थित होते.
फोटो (२८०५२०२१-कोल-सतेज पाटील पाहणी) : कोल्हापुरात शुक्रवारी ज्योतिर्लिंग कॉलनी - जरगनगर रस्त्यावरील पुलाच्या कामाची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी केली. यावेळी शेजारी मधुकर रामाणे, आदी उपस्थित होते.