स्वतःचा व्यवसाय सुरू करा, यशस्वी व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:49+5:302021-02-07T04:23:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सवलती, कर्ज योजना व शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय ...

Start your own business, be successful! | स्वतःचा व्यवसाय सुरू करा, यशस्वी व्हा!

स्वतःचा व्यवसाय सुरू करा, यशस्वी व्हा!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सवलती, कर्ज योजना व शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि जीवनात यशस्वी व्हा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बेरोजगार तरुणांना आज, शनिवारी केले.

हसन मुश्रीफ फाऊंडेशनतर्फे 'माझा व्यवसाय- माझा हक्क' या उपक्रमांतर्गत आयोजित गडहिंग्लज व उत्तर परिसरातील बेरोजगार तरुणांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, किसनराव कुराडे, जि. प. सदस्य युवराज पाटील, अमर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुश्रीफ म्हणाले, कागल आणि चंदगड मतदारसंघातील प्रत्येक गावातील एक-दोन तरुणांनी स्वतःच्या व्यवसायासाठी पुढे यावे, त्यांना फाउंडेशनतर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल.

उद्योजक संतोष शिंदे म्हणाले, व्यवसाय व उद्योगाची आयडिया डोक्यात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. स्वतःच्या आणि गडहिंग्लजच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढे यावे. त्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी आपणही तयार आहोत.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका संगीता चव्हाण, सचिन पवार यांनीही मार्गदर्शन केले.

फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांनी आभार मानले.

----- चौकट : म्हणूनच गडहिंग्लजची निवड!

गडहिंग्लजचे लोक उद्यमशील आणि उद्योग आणि व्यवसायावर प्रेम करणारे आहेत. त्यामुळे हा उपक्रम या ठिकाणी नक्कीच यशस्वी होईल, म्हणूनच मेळाव्यासाठी गडहिंग्लजची निवड केली, असे मुश्रीफ यांनी यावेळी नमूद केले.

-----

फोटोओळी- गडहिंग्लज येथे आयोजित मेळाव्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जे. बी. बारदेस्कर, नवीद मुश्रीफ, संगीता चव्हाण, सचिन पोवार, सतीश पाटील, किरण कदम, प्रकाश पताडे, हारुण सय्यद, गुंड्या पाटील उपस्थित होते.

Web Title: Start your own business, be successful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.