परभणीत आजपासून ग्रंथोत्सवास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:24 AM2017-11-20T00:24:14+5:302017-11-20T00:24:32+5:30

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या वतीने येथील वसमत रोड परिसरातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन केले आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे.

Starting from today, | परभणीत आजपासून ग्रंथोत्सवास सुरुवात

परभणीत आजपासून ग्रंथोत्सवास सुरुवात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या वतीने येथील वसमत रोड परिसरातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन केले आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे.
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर तर उद्घाटक म्हणून कवी प्रा.इंद्रजीत भालेराव यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा.संजय जाधव, जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.राहुल पाटील, आ.मधुसूदन केंद्रे, आ.विजय भांबळे, आ.मोहन फड, महापौर मीनाताई वरपूडकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
प्रारंभी सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. ‘प्रभावी वाचन माध्यम’ , ‘वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी उपाय’ या विषयावर परिसंवाद, कथा-कथन आदी कार्यक्रम होणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे.

Web Title: Starting from today,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.