जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 12:15 PM2020-08-17T12:15:15+5:302020-08-17T12:18:25+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

State and major roads in the district closed; Alternative route resumes | जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंदपर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

कोल्हापूर: जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, बाचणी बंधाऱ्यावर पाणी आल्याने शिरोली दुमालाकरिता पर्यायी मार्ग कसबा बीड, शिरोली घानवडे प्रजिमा 29 पासून तसेच बाचणीकरिता सडोली पासून वाहतुक सुरू, इस्फूर्ली, नागाव, खेबवडे, बाचणी मार्गे वाहतुक सुरू आहे.

महे पुलावर पाणी आल्याने सांगरूळ, आमशी, कसबा बीड व प्रजिमा 29 मार्गे वाहतुक सुरू, कोगे बंधाऱ्यावर पाणी आल्याने कुडित्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे करिता बालिंगा पाडळी कोगे मार्गे वाहतुक सुरू. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरू, निलेवाडी- पारगाव पुलावर पाणी आल्याने अमृतनगर,चिकोर्डे मार्गे वाहतुक सुरू  आहे.

गगनबावडा तालुक्यातील शेणवडे, अणदूर, धुंदवडे रस्त्यावर पाणी आल्याने अणदूर,मांडूकली, वेतवडे मार्गे वाहतुक सुरू, प्रजिमा क्र. 19 वर पाणी आल्याने पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद आहे. शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलावर पाणी आल्याने नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु आहे.

कागल तालुक्यातील सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगुड मार्गे वाहतूक सुरु. बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने अनुर ते बानगे मार्गे वाहतूक सुरु आहे.

पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने पोहाळे-पोहाळेवाडी व मलकापूर, येळवण, मांजरे, अणुस्कुरामार्गे वाहतुक सुरू, करंजफेण रस्त्यावर पाणी आल्याने मलकापूर, येळवण, जुगाई, अनुस्कूरामार्गे वाहतुक सुरू, केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू, गोठे पुलावर पाणी आल्याने मल्हारपेठे, सुळे, कोदवडे मार्गे वाहतुक सुरू, काखे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद, माजगाव पुलावर पाणी आल्याने कळे, पुनाळ, दिगवडे मार्गे वाहतूक सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर पुलावर पाणी आल्याने कनुर गवसे मार्गे वाहतूक सुरु, चंदगड पुलावर पाणी आल्याने पाटणे फाटा, पाटणे, मोटणवाडी मार्गे वाहतुक सुरू, दाटे गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने आमरोली, सोनारवाडी मार्गे वाहूक सुरु, करंजगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.  प्रजिमा क्र.62 मार्गावर पाणी आल्याने वाहतुक बंद, म्हालेवाडी,नित्तूर सीडी वर्कवर, कोवाड गावाजवळ तसेच काणूर व गवसे गावाजवळ पाणी आल्याने पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्याने दुंडगे, जरळी, मुंगळी, नुल मार्गे वाहतूक सुरु. येणेचवंडी कॉजवेवर पाणी आल्याने नुल, भडगाव, बेरडवाडी, नरेवाडी, नंदनवाड मार्गे वाहतुक सुरू, हलकर्णी कॉजवेवर पाणी आल्याने बसरगे, येणेचवंडी, नंदनवाड, हलकर्णी मार्गे वाहतूक सुरु आहे.

राधानगरी तालुक्यातील शिरगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने तारळे, राशिवडे मार्गे वाहतूक सुरु. शाहूवाडी तालुक्यातील कानसा नदीवरील मालेवाडी पुलावर पाणी आल्याने तुरूकवाडी, मलकापूर,निळे, भेंडवडे, उदगीरी, राघूचा वाडा, शित्तुर, उखळू मार्गे वाहतुक सुरू आहे. वारणा नदीवरील आरळा शित्तुर पुलावर पाणी आल्याने तुरूकवाडी, कोकरूड, शेडगेवाडी, आरळा मार्गे वाहतुक सुरू. आजरा तालुक्यातील साळगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने ओडीआर 139 सोहाळे, बाची, आजरा सुतगिरणीमार्गे वाहतूक सुरू आहे.

Web Title: State and major roads in the district closed; Alternative route resumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.