राधानगरीत पाऊस मोजण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा सुरू.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:13+5:302021-06-24T04:18:13+5:30

राधानगरी : विविध कारणांसाठी अत्यावश्यक असलेल्या पावसाची मोजणी करण्याची पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने पावसाबरोबर आर्द्रता, ...

State-of-the-art rain gauge system launched in Radhanagar. | राधानगरीत पाऊस मोजण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा सुरू.

राधानगरीत पाऊस मोजण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा सुरू.

Next

राधानगरी : विविध कारणांसाठी अत्यावश्यक असलेल्या पावसाची मोजणी करण्याची पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने पावसाबरोबर आर्द्रता, तापमान, वा-याचा वेग व दिशा याच्या दर दहा मिनिटाला अचूक माहिती देणारा अत्याधुनिक व स्वयंचलित महावेद हा प्रकल्प सुरू केला आहे. राज्यातील महसूल मंडलनिहाय २१०५ ठिकाणी अशी स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू केली आहेत. २०१७ मध्ये याची प्रयोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून तो सुरू आहे. तरीही गेल्या वर्षापर्यंत दोन्ही प्रकारे माहिती संकलित केली जात होती. मात्र यावर्षी जुन्या प्रकारे होणारे संकलन बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व स्कायमॅट वेदर सर्विसेस या खासगी कंपनीच्या सहभागातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पाच मिटर बाय सात मिटर एवढ्या मोकळ्या जमिनीत याची उभारणी केली आहे. मध्ये एक खांब आहे. त्यावर याचे पाच पॅरामिटर आहेत. त्यातून पाऊस, आर्द्रता, तापमान, वा-याचा वेग व दिशा याची सेन्सरद्वारे नोंद होते. याला सोलर पॅनल व चार्ज होणारी बॅटरी आहे. सूर्यप्रकाश नसला तरी दहा ते पंधरा दिवस चालेल एवढी क्षमता बॅटरीची आहे. यात संकलित होणारी ही सर्व माहिती दर दहा मिनिटाला कृषी आयुक्तालय पुणे येथील मुख्य सर्वरला नोंद होते. जिल्हा पातळीवर कृषी अधीक्षक अधिकारी यांनाच ती पाहता येते. या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे संकलित झालेल्या माहितीच्या आधारेच हवामान आधारित पंतप्रधान पीक विमा योजनेतील नुकसान भरपाई दिली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात ७६ ठिकाणी अशी केंद्रे सुरू केली आहेत. काही महसूल मंडल मुख्यालयाच्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी लगतच्या गावात त्याची उभारणी केली आहे. त्याची देखभाल करण्यासाठी स्कायमॅट वेदर सर्विसेस या कंपनीची नेमणूक केली आहे.

ठळक- 1) पारंपरिक पद्धतीने होणा-या पर्जन्य मोजणीतून स्थानिक पातळीवर याची माहिती मिळत होती. मात्र ती आता बंद झाली आहे. त्यासाठी स्कायमॅट वेदर हे मोबाइल अ‍ॅप स्थापित करणे आवश्यक आहे. पाटबंधारे विभागाच्या मोठ्या धरणांच्या ठिकाणी मात्र पारंपरिक पद्धतीनेच पावसाची मोजणी केली जाते. फोटो ओळ- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व स्कायमॅट वेदर सर्विसेस यांच्या सहभागातून प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी अशा प्रकारची स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू केली आहेत.

Web Title: State-of-the-art rain gauge system launched in Radhanagar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.