‘कलामंदिर’च्या विद्यार्थ्यांना राज्य पारितोषिक
By admin | Published: January 6, 2015 12:37 AM2015-01-06T00:37:54+5:302015-01-06T00:50:42+5:30
या प्रदर्शनात महाविद्यालयातील शिल्पकलेतील १४ कलाकृती व पेंटिंग विभागातील चार विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली होती.
कोल्हापूर : राज्य शासनाच्या कलासंचालनालय विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या ५५ व्या राज्य कलाप्रदर्शनात कुमावत सेवा संघ संचलित कलामंदिर महाविद्यालयाच्या रवी लोहार व राजा मोहिते या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले.
शिल्पकला विभागात रवी भरमाण्णा लोहार व राजा मोहिते यांच्या शिल्पास पारितोषिक मिळाले. या प्रदर्शनात महाविद्यालयातील शिल्पकलेतील १४ कलाकृती व पेंटिंग विभागातील चार विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली होती. या प्रदर्शनात फौंडेशन व पेंटिंग विभागातील गौरव वाडकर, प्रशांत दिवटे, आशिष कुंभार, अक्षय खोत, शिल्पकला विभागात सुमेध सावंत, घनश्याम चावरे, विशाल माजगांवकर, महेश मासेकर, कृष्णात कुंभार, संदीप कुंभार, वीजेंद्र मांजरेकर, उत्कर्ष सुतार, सुनील यरकदावर, अवधूत वडणगेकर, अभिलाष भालेराव, अक्षय कुंभार यांच्या शिल्पकृती प्रदर्शित झाल्या आहेत.
या कलाकृतींचे प्रदर्शन नागपूरमध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्य दयानंद माळी, जी. एस. माजगावकर, डी. व्ही. वडणगेकर, किशोर पुरेकर, आप्पासाहेब घाटगे, प्रदीप कुंभार, योगेश मोरे,
सर्जेराव निगवेकर, संभाजी
माजगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)