राज्य बालनाट्य प्राथमिक फेरी ६ जानेवारीपासून कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 04:53 PM2019-12-23T16:53:34+5:302019-12-23T16:56:57+5:30

यंदा प्रथमच कोल्हापूर केंद्रावर सतराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ जानेवारी २०२० पासून आयोजित करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीतील २१ बालनाट्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात, तर उर्वरित १८ सांगली येथे सादर केली जाणार आहेत.

State Balantiya Primary Round from 1st January in Kolhapur | राज्य बालनाट्य प्राथमिक फेरी ६ जानेवारीपासून कोल्हापुरात

राज्य बालनाट्य प्राथमिक फेरी ६ जानेवारीपासून कोल्हापुरात

googlenewsNext
ठळक मुद्दे यंदा प्रथमच कोल्हापुरात स्वतंत्र केंद्रकेशवराव भोसले नाट्यगृहात २१, तर सांगलीत १८ नाट्ये सादर होणार

कोल्हापूर : यंदा प्रथमच कोल्हापूर केंद्रावर सतराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ जानेवारी २०२० पासून आयोजित करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीतील २१ बालनाट्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात, तर उर्वरित १८ सांगली येथे सादर केली जाणार आहेत.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी अर्थात ६ जानेवारीला सकाळी १० वाजता वरेरकर नाट्य संघ, टिळकवाडी, बेळगावतर्फे जितेंद्र रेडेकर लिखित ‘ईश्वरा’, सकाळी ११.१५ वाजता मथुरा शिक्षण संस्था, इचलकरंजीतर्फे विजयकुमार शिंदे लिखित ‘पांडवांची दीदी’, दुपारी १२.३० वा. बालाजी पब्लिक स्कूल, टाकवडेतर्फे हनुमान सुरवसे लिखित ‘खेळ’, दुपारी १.४५ वा. बालाजी माध्यमिक विद्यामंदिर, इचलकरंजीतर्फे हनुमान सुरवसे लिखित ‘हलगीसम्राट’ सादर केले जाणार आहे.

सात जानेवारीला सकाळी १० वा. शिंदे अकॅडमीतर्फे सतीश साळुंके लिखित ‘सोनेरी पिंजऱ्यातील पोपट,’ तर सकाळी ११.१५ वा. सरस्वती विद्यामंदिर, दापोलीतर्फे उदय गोडबोले लिखित ‘एका झाडाची गोष्ट,’ दुपारी १२.३० वा. समर्थ रंगभूमी, रत्नागिरीतर्फे प्रतापसिंह चव्हाण लिखित ‘प्रश्न’, दुपारी १.४५ वाजता प्रज्ञान कला अकादमी, वारणानगरतर्फे, जगदीश पवार लिखित ‘निबंध,’ दुपारी ३ वा. पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा, धनंजय सरदेशपांडे लिखित ‘गणपती बाप्पा हाजीर हो,’ तर ८ जानेवारीला सकाळी १० वा. ‘नाट्यशुभांगी’तर्फे मंजूश्री गोखले लिखित ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’, सकाळी ११.१५ वा. गुरुकुल प्राथमिक विद्यालय, पेठवडगावतर्फे ज्योतिराम कदम लिखित ‘झाडे लावा - देश वाचवा’, दुपारी १२.३० वा. ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलतर्फे अमर नाईकबा इंगवले लिखित ‘न्याय हा होणारच’, दुपारी १.४५ वाजता गायन समाज देवल क्लबतर्फे युवराज केळुसकरलिखित ‘सोन्याचा तुरा,सादर होणार आहे.

 नऊ जानेवारीला सकाळी १० वा. गडहिंग्लज कला अकादमीतर्फे प्रसाद खानोलकरलिखित ‘हिरवी बाभळ’, स. ११.१५ वा. डी. एस. नाडगे संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय, कारदगा, निपाणीतर्फे धनंजय सरदेशपांडे लिखित ’मदर्स डे’, दुपारी १२.३० वा. भगतसिंग युवक मंडळ पाटील गल्ली, बेळगावतर्फे अवधूत पावसकर लिखित ‘कधीही न संपणारी गोष्ट’, दुपारी १.४५ वा. बहुरूपी कलामंच, कोल्हापूरतर्फे योगेश सोमण लिखित ‘झेप’सादर होणार आहे.

१० जानेवारीला स. १० वा. आजरा हायस्कूलतर्फे मधुमती जोगळेकर-पवार लिखित ‘जयस्तुते’, सकाळी ११.१५ वा. आदर्श शिक्षण मंडळ, इचलकरंजीतर्फे उदय गोडबोले लिखित ‘एका झाडाची गोष्ट’, दुपारी १२.३० वा. आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगावतर्फे दत्ता टोळ लिखित ‘आळशाचा गाव’, दुपारी १.४५ वा. अभिरुचीतर्फे प्राची गोडबोले लिखित ‘पिलूची गोष्ट’ ही २१ नाटके सादर केली जाणार आहेत. याशिवाय सांगली येथे उर्वरित १८ बालनाट्ये सादर होणार आहेत.

 

Web Title: State Balantiya Primary Round from 1st January in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.