स्टेट बँकेतर्फे यशस्वी उद्योजक महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:24 AM2021-03-10T04:24:07+5:302021-03-10T04:24:07+5:30
कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त स्टेट बँक कर्ज शाखेतर्फे यशस्वी उद्योजक महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली. बँकेने त्यांना ...
कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त स्टेट बँक कर्ज शाखेतर्फे यशस्वी उद्योजक महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली. बँकेने त्यांना केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनेतून अर्थसाहाय्य केले आहे.
यावेळी अपर्णा जोशी (वूमन्स कॉटेज), गायत्री लाड (समर्थ इंडस्ट्रीज), पद्मश्री घोलप (पद्मकमल फूड्स), मनीषा घोडे (एसजी फार्मा), तेजाली गुरव यांचा सत्कार शाखेचे सहायक महाप्रबंधक पंकज मून यांच्या हस्ते करण्यात आला. स्त्रीला कमजोर समजू नये, तिला समाजाने रोजच्या जगण्यात बरोबरीचे स्थान दिले पाहिजे, अशी अपेक्षा मून यांनी व्यक्त केली. बँकेने उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी अर्थसाहाय्य केल्यामुळेच आम्ही यशस्वी उद्योजिका होऊ शकलो, अशा भावना सत्कार झालेल्या उद्योजक महिलांनी व्यक्त केल्या. स्वागत प्रियंका वाडकर यांनी केले. संयोजन उपव्यवस्थापक करण म्हेतर यांनी केले. शुभांगी गडदे यांनी आभार मानले.
फोटो ०९०३२०२१-कोल-एसबीआय सत्कार
कोल्हापुरातील स्टेट बँकेच्या कर्ज शाखेतर्फे सोमवारी महिला दिन साजरा करण्यात आला.