राज्य बँकेला ३२५ कोटींचा निव्वळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:23 AM2021-03-21T04:23:08+5:302021-03-21T04:23:08+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला २०१९-२० या आर्थिक वर्षात तब्बल ३२५ कोटींचा निव्वळ नफा झाला असून, बँकेच्या १०९ ...
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला २०१९-२० या आर्थिक वर्षात तब्बल ३२५ कोटींचा निव्वळ नफा झाला असून, बँकेच्या १०९ वर्षाच्या इतिहासात प्रथमच अनेक उच्चांक केल्याची माहिती बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.
बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी बँकेच्या मुख्य कार्यालयात ऑनलाइन आयोजित केली होती. यावेळी प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अनास्कर म्हणाले, ‘बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ४१ हजार ६६६ कोटी इतकी उच्चांकी उलाढाल केली आहे. १३.११ टक्के भांडवल पर्याप्तता राखण्यात यश आले असून, बँकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) २२८२ कोटी आहे. अहवाल सालात बँकेला १३४५ कोटी ढोबळ नफा तर तरतुदीनंतर ३२५ कोटीचा निव्वळ नफा झाला आहे. व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, सभासद उपस्थित होते.
यामुळेच झाला नफा
बँकेने आपले व्यवहार केवळ जिल्हा बँक अथवा साखर कारखान्यापुरते मर्यादित न ठेवता, राज्यातील नागरी बँका, पतसंस्था, हाऊसिंग सोसायट्या आदी सहकारी संस्थांसाठी अनेक योजना राबवल्या. सहकारी बँकांना सरकारी कर्जरोख्यांची खरेदी, विक्री करण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्यामुळेच विक्रमी नफा झाल्याचे अध्यक्ष अनास्कर यांनी सांगितले.