राज्य नाट्य स्पर्धा २४ नोव्हेंबरपासून
By admin | Published: October 22, 2015 12:37 AM2015-10-22T00:37:05+5:302015-10-22T00:52:44+5:30
पंधरा संघांचा सहभाग : सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आयोजन
कोल्हापूर, : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५५ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी २४ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जिल्ह्यातील पंधरा नाट्यसंस्थांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, मिलिंद अष्टेकर स्पर्धा समन्वयक आहेत. सध्याच्या नियोजनानुसार शाहू स्मारक भवनात स्पर्धा होणार असल्याचे जाहीर झाले असले तरी दरम्यानच्या काळात केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन झाल्यास तेथेच स्पर्धा होणार आहेत. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे उद्घाटन झालेच नाही तर शाहू स्मारक भवनात स्पर्धा होणार आहे. येथे स्पर्धा झाल्यास काही प्रयोग दुपारी एक वाजता घ्यावे लागणार आहेत. कारण यापूर्वीच काही संस्थांनी शाहू स्मारकचे बुकिंग केले आहे, त्यामुळे नाट्य संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन मिलिंद अष्टेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
सादर होणारी नाटके
दिनांकवेळनाटक व संस्था
२४ नोव्हेंबररात्री ९ वाजतातुकाराम माळी तालीम मंडळ (साखर खाल्लेला माणूस)
२५ नोव्हेंबर रात्री ९ वाजताहनुमान तरुण मंडळ (अग्निदिव्य)
२६ नोव्हेंबररात्री ९ वाजतासुगुण नाट्य संस्था (इच्छा माझी पुरी करा)
२७ नोव्हेंबररात्री ९ वाजतारूद्राक्ष अकॅडमी (डॅडी आय लव्ह यू)
३० नोव्हेंबर रात्री ९ वाजतारंगयात्रा नाट्य संस्था (कदाचित)
१ डिसेंबरदुपारी १ वाजता प्रत्यय नाट्य संस्था (कबीर)
२ डिसेंबरदुपारी १ वाजताप्रतिज्ञा नाट्य संस्था (सुवर्णपदक)
३ डिसेंबरदुपारी १ वाजताफिनिक्स क्रिएशन्स (नाव झालेच पाहिजे)
४ डिसेंबरदुपारी १ वाजताप्रज्ञान कला अकॅडमी (आला रे राजा)
५ डिसेंबर दुपारी १ वाजतापरिवर्तन कला फौंडेशन (एक था गुरू)
६ डिसेंबर दुपारी १ वाजतानाट्यशुभांगी संस्था (मी इतिहास गाडला नाही)
७ डिसेंबर दुपारी १ वाजताकुंभी-कासारी बहुउद्देशीय शेतकरी मंडळ (आशानाम मनुष्याणाम)
८ डिसेंबर रात्री ९ वाजतादेवल क्लब (सूक्ष्म आणि पूर्ण)
९ डिसेंबर रात्री ९ वाजताभालजी पेंढारकर कला केंद्र (युगांत)
१० डिसेंबर रात्री ९ वाजताअभिरुची संस्था (बळी)