राज्य सरकारी कर्मचाºयांचा गुरुवारपासून संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:44 PM2017-09-19T16:44:18+5:302017-09-19T16:44:22+5:30

अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यास शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना गुरुवारपासून दोन दिवसांच्या संपावर जाणार आहे.

State Government employees will be from Thursday | राज्य सरकारी कर्मचाºयांचा गुरुवारपासून संप

राज्य सरकारी कर्मचाºयांचा गुरुवारपासून संप

Next

कोल्हापूर : अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यास शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना उद्या, गुरुवारपासून दोन दिवसांच्या संपावर जाणार आहे.


या संपात जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागांतील व वैद्यकीय महाविद्यालयांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात उतरणार आहेत. सीपीआर हॉस्पिटल येथे झालेल्या सभेमध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास २७ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


यावेळी मध्यवर्ती जिल्हा शाखा कोल्हापूर संघटनेचे सरचिटणीस संजय क्षीरसागर, आरोग्य विभाग, जिल्हाध्यक्ष कृष्णा नाईक, सरचिटणीस गणेश आसगावकर, रघुनाथ कोटकर, चरण घावरी, विश्वास पाटील, किरण आटोळे, सुरेंद्र कांबळे, राणी घावरी, वैजयंता कांबळे, संपदा हराळे, साऊबाई जाधव, जयसिंग जाधव, शिवाजी निकम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: State Government employees will be from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.