राज्य सरकारने मशागतीसाठी दहा हजार अनुदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:44+5:302021-05-21T04:25:44+5:30
कोल्हापूर : तब्बल १४ हजार ७७५ कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन ...
कोल्हापूर : तब्बल १४ हजार ७७५ कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामासाठी दहा हजार रुपयांचे सरसकट अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केली आहे.
पत्रकात म्हटले आहे, खत अनुदानासाठी प्रयत्न केल्याचा कांगावा करून त्याचे श्रेय घेण्याची धडपड न करता, आता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना राज्य सरकारने खत सुलभतेने उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये फॉस्फरिक ॲसिड, अमोनियाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने खतांच्या किमतींत झालेल्या वाढीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार हे ओळखून गेल्याच आठवड्यात मोदी सरकारने त्यावर उपाययोजना सुरू केल्या होत्या. हे लक्षात घेऊन ‘जाणते नेते’ म्हणविणाऱ्या काहींनी दरवाढ मागे घेण्याची मागणी केली; पण त्याआधीच अनुदानाचा निर्णय झाल्याने त्यांची श्रेयाची संधी हुकली.