"राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्य नागरीकांना दिलासा द्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 03:26 PM2021-11-11T15:26:20+5:302021-11-11T15:33:51+5:30

Chandrakant Patil : केंद्राच्या निर्णयानंतर देशातील बहुतांश राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित उत्पादन शुल्कात कपात केली आहे.

State government should reduce petrol-diesel rates to provide relief to ordinary citizens says chandrakant patil | "राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्य नागरीकांना दिलासा द्यावा"

"राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्य नागरीकांना दिलासा द्यावा"

Next

कोल्हापूर - केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील बहुतांश राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित उत्पादन शुल्कात कपात केली आहे. परंतु महाराष्ट्रातील हे सरकार फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपले इतर धंदे करण्यात रममान असल्याचे चित्र दिसत आहे. याच्या निषेधार्थ व सरकारने पेट्रोल-डीझेलचे दर कमी करून सर्वसामान्य नागरीकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील य़ांनी केंद्राने पेट्रोल-डीझेलवरील कर कमी केला, त्यामुळे पेट्रोल-डीझेलचे दर ५ ते १० रुपयांनी कमी झाले. या केंद्राच्या निर्णयानंतर देशातील बहुतांश राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याने देखील अद्यापही आपल्या हिस्याचा अपकारी कर का कमी करत नाही असा सवाल केला. लोक हिताचे निर्णय स्वबळावर घेता आले नाहीत तर फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवणे इतकीच महाराष्ट्र राज्याची सध्याची भूमिका दिसत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालया समोर अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे. केंद्राच्या अनेक योजनांचा लाभ घ्यायचा आणि आपल्या हिस्यातील कामासाठी पुन्हा केंद्राकडे बोट दाखवायचे अशी दुटप्पी भूमिका या सरकारची आहे असं म्हटलं आहे.

 सध्या पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या दरावरून पुन्हा एकदा राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करत आहे. घोटाळे, अत्याचार, लुबाडणूक, बलात्कार, खंडणी अशा कामात वेळ दौडणाऱ्या या राज्य सरकारला सर्व सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी वेळ आणि निर्णय क्षमता नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने पेट्रोल डिझेल लावलेले कर कमी केलं तर महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळेल. पण, राज्य सरकारला जनतेला कोणताही दिलासा द्यायचा नाही असे चित्र सर्वत्र आहे. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, भाजपा प्र.का.सदस्य महेश जाधव, भाजपा प.म.प्रवक्ते धनंजय महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम, भगवान काटे यांच्या उपस्थितीमध्ये निवासी जिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना निवेदन सादर करत आपल्या माध्यमातून राज्य सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी आपले कर कमी करून पेट्रोल व डीझेलचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली. 

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सरकारमध्ये इतकी असंवेदनशीलता, मुजोरी कोठून येते असा सवाल उपस्थित केला. १७ महिन्यांचे पगार अद्याप त्यांना दिले गेलेले नाहीत, आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत असल्यास त्याला राजकारण म्हणत असाल तर आम्ही या कर्मचा-यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, भाजपा प्र.का सदस्य  महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये राज्य सरकारच्या या घटनांचा जाहीर निषेध व्यक्त केला.
 

Web Title: State government should reduce petrol-diesel rates to provide relief to ordinary citizens says chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.