VIDEO: सरकारने पूरग्रस्तांना नवीन घरे बांधून द्यावीत - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 07:16 PM2019-08-14T19:16:48+5:302019-08-14T21:56:54+5:30
खरीपाचे मोठे नुकसान झाले असून यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने संपुर्ण कर्जमाफीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने सरकारने त्यांची घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.
कोल्हापूर : खरीपाचे मोठे नुकसान झाले असून यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने संपुर्ण कर्जमाफीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने सरकारने त्यांची घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिरोळ तालुक्याचा दौरा केल्यानंतर पूरस्थितीची भिषणतेबाबत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राच्या अर्थकारणात या तीन जिल्ह्याचे योगदान मोठे असून येथील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे.
ज्या ऊसाचे शेंडे पाण्याखाली राहिले तेथील ऊस हाताला लागणार नाही,अशी सद्यस्थिती आहे. या हंगामात ३० ते ३५ टक्के ऊसाचे उत्पादन घटणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या वतीने पीक तज्ञांची दहा टीम तीन जिल्ह्यात पाठवल्या आहेत.