पर्यावरण संतुलनासाठी राज्य शासनाचे ५० कोटीचे उदिष्ट : चंद्रकांतदादा पाटील

By admin | Published: July 1, 2017 06:26 PM2017-07-01T18:26:37+5:302017-07-01T18:26:37+5:30

जिल्हयातील वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ

State Government's 50 crore target for environmental balance: Chandrakant Dada Patil | पर्यावरण संतुलनासाठी राज्य शासनाचे ५० कोटीचे उदिष्ट : चंद्रकांतदादा पाटील

पर्यावरण संतुलनासाठी राज्य शासनाचे ५० कोटीचे उदिष्ट : चंद्रकांतदादा पाटील

Next

आॅनलाईन लोकमत


कोल्हापूर, दि. 0१ : पर्यावरण संतुलनासाठी राज्य शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले,असून जनतेकडून वृक्षलागवड कार्यक्रमास संपूर्ण राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी दोन कोटी ८२ लाख वृक्षलागवड केली असून यंदा ४ कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ६ कोटी पर्यंत वृक्षलागवड होईल, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ तसेच स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त १ ते ७ जुलै या कृषी सप्ताहाचा शुभारंभही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठ परिसरात करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बकुळीचे रोप लावण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, महापौर हसिना फरास, कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा, एमएमआरडीचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, मुख्य वन संरक्षक अरविंद पाटील, उप वन संरक्षक प्रभुनाथ शुक्ल, सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक दिपक खाडे, कृषी सह संचालक डॉ. नारायण शिसोदे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

वाढते शहरीकरण आणि कमी होत चाललेली वृक्षसंपदा ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य शासनाने २0१९ पर्यंत राज्यात ५0 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला असून, यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भामध्ये अत्यल्प वृक्षसंपदा असल्याने या भागात झाडे लावण्यावर भर दिला आहे. वृक्ष लागवड जितकी महत्वाची आहे, तितकेच महत्वाचे हे वृक्ष जगवणे आहे, वृक्ष संवधर्नासाठी संपूर्ण समाजाने सक्रीय योगदान देणे गरजेचे आहे. निसर्ग संवर्धन ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.

 


वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यातील जनतेने वृक्ष लावून वृक्ष दिवाळी साजरी करावी, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदा राज्यात ४ कोटी वृक्षलागवड करण्यात येणार असून, पुढीलवर्षी ८ कोटी झाडे लावण्याचे नियोजन आहे. या मोहिमेंतर्गत लावलेल्या झाडांचे जगण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता यंदा ८ लाख ७0 हजाराहून अधिक झाडे लावण्याचे नियोजन असून, आतापर्यंत १४ हजार लोकांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. शिवाजी विद्यापीठ परिसरात आज ४00 झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात ही मोहिम अधिक गतिमान करुन संपूर्ण जिल्हा हरित जिल्हा करण्यासाठी सर्वांनी सक्रीय राहूया, असे आवाहनही त्यांनी केले.

रावे असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ३४ हजार कोटींची कजर्माफी केली आहे. राज्यातील ८९ लाख लोकांना या कजर्माफीचा फायदा होणार असून, ४0 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. आता शेतक?्यांसाठी कृषि विभागाने सक्रीय होवून कृषि विकासाच्या योजना, उपक्रम याची माहिती बांधावर जावून देणे गरजेचे आहे.

शेतक?्यांचा उत्पादन खर्च शुन्य करुन उत्पादन वाढविण्याची मोहिम कृषि विभागाने लोकसहभागातून हाती घेणे गरजेचे असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातही दरवाड गावात यंदा हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर हाती घेतला असून, २६७ कुटुंबांना भातशेतीसाठी बियाणे, खते आणि किटकनाशके पुरविण्यात आली आहेत. या शेतीतील उत्पादनाला बाजारपेठही मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. याचपद्धतीने गावागावात हा प्रकल्प कृषि विभागाने लोकसहभागातून राबवावा अशी सूचना त्यांनी केली.

याप्रसंगी कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा म्हणाले, राज्य शासनाने यंदा वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ४ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वृक्ष लागवडीची ही मोहिम लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी जनतेने पुढाकार घेवून वृक्षलागवड चळवळीला व्यापक स्वरुप द्यावे असे आवाहन करुन वृक्षारोपण हा दिवाळीसारखा उत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, राज्यात ४ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात यंदा ८ लाख ६0 हजाराचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जिल्ह्यात यंदा ३२ लाख रोपे उपलब्ध असून संस्था, संघटना, मंडळे तसेच जनतेने अधिकाधीक झाडे लावून वृक्षारोपणाची मोहिम यशस्वी करावी.

मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात सांगितले, जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रीय झाल्या असून, जनतेचेही उत्स्फुर्त सहकार्य मिळत आहे. वन विभागाच्या वतीने रोपे आपल्या दारी या उपक्रमातून १ ते ५ जुलै या काळात नोंदणी करणा?्यांना घरपोच रोपे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील जनतेने वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आला. या समारंभाप्रसंगी कृषि क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी सहाय्यक वन संरक्षक सुहास साळोखे यांनी आभार मानले.

या समारंभास शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर, निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र खाडे, तहसिलदार उत्तम दिघे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरीष जगताप, कृषि अधिकारी सुरेश मगदूम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुयर्वंशी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी तसेच अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांनी सुत्र संचालन केले.

Web Title: State Government's 50 crore target for environmental balance: Chandrakant Dada Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.