दुग्धोत्पादनात राज्य दोन वर्षांत अग्रस्थानी : जानकर

By admin | Published: May 19, 2017 11:26 PM2017-05-19T23:26:04+5:302017-05-19T23:26:04+5:30

दुग्धोत्पादनात राज्य दोन वर्षांत अग्रस्थानी : जानकर

The state of milk production in two years: Knowing | दुग्धोत्पादनात राज्य दोन वर्षांत अग्रस्थानी : जानकर

दुग्धोत्पादनात राज्य दोन वर्षांत अग्रस्थानी : जानकर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वैभववाडी : दुग्ध उत्पादनात एकेकाळी देशात पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आधीच्या सरकारने अंग काढून घेतल्यामुळे सातव्या क्रमांकावर घसरला आहे. परंतु, आमच्या सरकारने दुग्ध व्यवसायात पुन्हा सहभाग घेतला असून, येत्या दोन वर्षांत आपले राज्य परत पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वास दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
एडगाव येथील तानाजी गुरव यांच्या निवासस्थानी मंत्री जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट, सभापती लक्ष्मण रावराणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, जिल्हा परिषद सदस्यसुधीर नकाशे, माजी महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल, प्रज्ञा ढवण, आदी उपस्थित होते.
मंत्री जानकर म्हणाले की, शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादन वाढवून संपूर्ण दूध शासकीय संघांना घालणे गरजेचे आहे. शासकीय संस्था भक्कम झाल्या तरच शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला भविष्यात प्रतिलिटर ६५ रुपये दर मिळणार आहे. ते पुढे म्हणाले की, पशुसंवर्धन विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. एमपीएससीद्वारे राज्यात पशुसंवर्धन अधिकारी पदे भरली जाणार असून, त्यातून जिल्ह्याला नेमणुका दिल्या जातील. तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांवर तातडीने शस्त्रक्रिया होण्यासाठी व्हेटर्नरी व्हेईकल प्रत्येक तालुक्याला दिली जाणार आहे.
चौकट
धनगर समाजाला निश्चित आरक्षण मिळणार
सरकारला धनगर समाजाला आरक्षण देण्याची इच्छा आहे का? असे विचारले असता, धनगर समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळेल यात शंका नाही. मात्र, विरोधकांनी या मुद्याचे उगाच राजकारण करू नये. आरक्षणाचे राजकारण करणाऱ्यांनी किती वर्षे राज्य केले. तेव्हा त्यांना आरक्षण द्यावेसे का वाटले नाही? असा सवाल करीत एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपणास धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आश्वासन दिले आहे. केवळ धनगरच नव्हे मराठ्यांनाही हे सरकार आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे, असे महादेव जानकर यांनी सांगितले.
माझं खातं लकी आहे!
महादेव जानकर म्हणाले की, या खात्याचा कारभार करताना मुक्या प्राण्याची सेवा करायला मिळते. त्यामुळे पुण्यही लाभते. यापूर्वी या खात्याचा कारभार नारायण राणे, स्वर्गीय विलासराव देशमुख, बॅ. ए. आर. अंतुले यांनी पाहिला आहे. त्यांना प्राणिमात्रांचा आशीर्वाद (मुख्यमंत्रिपद) लाभला आहे. त्यामुळे माझं खातं लकी आहे, असे मिश्किल विधान करीत माझा पक्ष खूप लहान आहे. तरीही मला जे मिळालंय ते मित्रांमुळे, असे त्यांनी शेवटी सांगितले.

Web Title: The state of milk production in two years: Knowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.