शिवाजी विद्यापीठात गुरुवारपासून राज्य महिला आरोग्य हक्क परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:42 AM2018-11-13T11:42:44+5:302018-11-13T11:46:24+5:30
सातवी महाराष्ट्र राज्य महिला आरोग्य हक्क परिषद शिवाजी विद्यापीठात गुरुवार (दि. १५) ते शनिवार (दि. १७) दरम्यान होणार आहे. विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीने आयोजित केलेल्या परिषदेचा विषय ‘महाराष्ट्र : सामाजिक, राजकीय वर्तमान आणि महिलांचे आरोग्य’ असा आहे, अशी माहिती परिषदेच्या निमंत्रक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी दिली.
कोल्हापूर : सातवी महाराष्ट्र राज्य महिलाआरोग्य हक्क परिषद शिवाजी विद्यापीठात गुरुवार (दि. १५) ते शनिवार (दि. १७) दरम्यान होणार आहे. विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीने आयोजित केलेल्या परिषदेचा विषय ‘महाराष्ट्र : सामाजिक, राजकीय वर्तमान आणि महिलांचे आरोग्य’ असा आहे, अशी माहिती परिषदेच्या निमंत्रक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी दिली.
या परिषदेस आरोग्य व विकासाच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या सुमारे ३00 महिला कार्यकर्त्या राज्यभरातून उपस्थित राहणार आहेत. महिला, विविध वंचित घटकांच्या आरोग्य आणि जगण्याच्या हक्कांच्या अनुषंगाने आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक वर्तमानाच्या संदर्भात अनेक मुद्यांवर परिषदेमध्ये विचारमंथन होणार आहे.
विद्यापीठातील वि. स. खांडेकर सभागृहातील या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, विचारवंत मनीषा गुप्ते यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, अॅड. पल्लवी रेणके, प्रा. डॉ. राजन गवस, मेधा काळे, रंजना कान्हेरे, मीना शेषू, मेघा पानसरे, मेधा थत्ते, सीमा कुलकर्णी, शाहीन शेख, आदी मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचा समारोप शनिवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. भारती पाटील यांनी दिली.
परिषदेतील विषय
ऊसतोडणी, घरगुती, बांधकाम, कचरावेचक, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न, त्यांचे आरोग्याधिकार, शासकीय आरोग्य सेवा, योजना, माइक्रोफायनान्सचा वेढा, महिलांचे मानसिक आरोग्य, आदी विविध विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे.