कावळटेक धनगरवाडा शाळेच्या दुरवस्थेबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:29 AM2021-08-19T04:29:36+5:302021-08-19T04:29:36+5:30

निवेदनात म्हटले आहे की, सदर शाळेच्या दुरवस्थेचे व्हिडिओ फुटेज घेतले असून, शाळेची स्टाफ रूम, विद्यार्थी बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याच्या ...

Statement to the group development officer regarding the poor condition of Kavaltek Dhangarwada school | कावळटेक धनगरवाडा शाळेच्या दुरवस्थेबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

कावळटेक धनगरवाडा शाळेच्या दुरवस्थेबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

Next

निवेदनात म्हटले आहे की, सदर शाळेच्या दुरवस्थेचे व्हिडिओ फुटेज घेतले असून, शाळेची स्टाफ रूम, विद्यार्थी बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शाळेची पडझड याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.

शाळेत कोणी शिक्षक येत नाही असे दिसून आले आहे. संबंधित शिक्षक व अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व अधिकाऱ्यांनी शाळेच्या दुरवस्थेबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. निवेदनावर जी. एस. कांबळे व चिले यांच्या सह्या आहेत.

फोटो = कावळटेक, ता. गगनबावडा येथील शाळेची झालेली दुरवस्था.

Web Title: Statement to the group development officer regarding the poor condition of Kavaltek Dhangarwada school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.